esakal | पिंपरी:‘सायक्लोथॉन’द्वारे आरोग्याचा संदेश । Cyclothon
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी:‘सायक्लोथॉन’द्वारे आरोग्याचा संदेश

पिंपरी:‘सायक्लोथॉन’द्वारे आरोग्याचा संदेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी; रविवार सुटीचा दिवस. पहाटेचा मंद गारवा. निगडीतील भक्ती-शक्ती चौक परिसर. एकेक जण सायकलवर येत होते. डोक्यात हेल्मेट. देशभक्तिपर गीतांनी वातावरण भारावून गेले होते. पांढरा ध्वज हवेत फडकवून इशारा केला आणि सायक्लोथॉन सुरू झाले. सुमारे तीन हजार सायकलस्वार सहभागी झाले होते. यात लहान मुलांसह महिलांची संख्याही लक्षणीय होती.

हेही वाचा: आदित्य इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत

केंद्र सरकारच्या ‘आझादी का अमृत महोत्सव’अंतर्गत महापालिका व स्मार्ट सिटी यांच्यातर्फे सायक्लोथॉन स्पर्धा तीन गटात झाली. निगडी भक्ती-शक्ती चौकातून सकाळी सहा वाजता प्रारंभ झाला. स्पर्धेनंतर झुम्बा, योग असे कार्यक्रम झाले. स्पर्धेत सहभागी ८३ वर्षांचे डॉ. बी. डी. नाईक यांना सायकल भेट दिली.

महापौर उषा ढोरे, उपमहापौर हिराबाई घुले, सत्तारूढ पक्षनेता नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील, मनसे गटनेता सचिन चिखले, ‘अ’ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, माजी उपमहापौर शैलजा मोरे, टाटा मोटर्स युनियन अध्यक्ष सचिन लांडगे, स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे आदी उपस्थित होते. अविरत श्रमदान संघटना, पतंजली योग समिती, झुम्बा क्लबने सहभाग घेतला.

हेही वाचा: स्थानिक भूमिपुत्रांच्या नोकऱ्यासाठी प्रयत्न करणार : उदय सामंत

भक्ती-शक्ती चौक- निसर्ग दर्शन सोसायटी-पिंपरी चिंचवड इंजिनिअरिंग कॉलेज- धर्मराज चौक- बास्केट ब्रिज- मुकाई चौक- देहूरोड कात्रज बाह्यवळण मार्ग, भूमकर चौक- यु टर्न वाय जंक्शन देहूरोड- सोमाटणे फाटा टोलनाका- देहूरोड मुकाई चौकातून - बास्केट ब्रिज- डांगे चौक- सांगवी फाटा- यु टर्न घेऊन काळेवाडी फाटा- एम्पायर इस्टेट उड्डाणपूल- आयुक्त बंगला- केएसबी चौक- कुदळवाडी स्पाईन रस्ता चौक- जय गणेश साम्राज्य- यु टर्न घेऊल साने चौक- थरमॅक्स चौक- दुर्गानगर चौक- भक्ती-शक्ती चौक, असा ७५ किलोमीटर सायकल स्पर्धेचा मार्ग होता. १५ किलोमीटर सायक्लोथॉन भक्ती-शक्ती चौकापासून किवळे बीआरटीएस टर्मिनल व पुन्हा भक्ती-शक्ती चौक आणि सात किलोमीटरसाठी भक्ती-शक्ती चौक- आकुर्डी स्टेशन- संभाजी चौक ते भक्ती-शक्ती चौक असा मार्ग होता.

"शहरातील प्रदूषण टाळण्यासाठी व आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सायकल प्रवास गरजेचा आहे. शहरात सायकल चालविणाऱ्यांची संख्या वाढविण्याकरिता महापालिकेच्या माध्यमातून रस्ते, सायकल मार्ग तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी नागरिकांचे सहकार्य गरजेचे आहे."- राजेश पाटील, आयुक्त, महापालिका

महिलांमध्ये उत्साह

सायक्लोथॉन स्पर्धेचे स्वरूप राष्ट्रीयस्तरावरील होते. ५०० पेक्षा जास्त महिलांनी सहभाग घेतला. मुलांसाठी सात किलोमीटर, सर्वसाधारण गटासाठी १५ किलोमीटर आणि सायकलपटू खेळाडूंसाठी ७५ किलोमीटर अंतराची स्पर्धा झाली.

loading image
go to top