esakal | पिंपरी: पंचवीस लाखांसाठी तरुणाचे अपहरण । Kidnapping case
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी: पंचवीस लाखांसाठी तरुणाचे अपहरण

पिंपरी: पंचवीस लाखांसाठी तरुणाचे अपहरण

sakal_logo
By
मंगेश पांडे

पिंपरी: पंचवीस लाखांसाठी तरुणाचे अपहरण केले. जिवंत सोडायचे असल्यास पैशांची मागणी केली. जीवाला धोका असल्याने तरुणाच्या भावाने पोलिसांकडे धाव घेतली. पिंपरी - चिंचवड पोलिसांनी मोबाईल लोकेशन तपासून, सापळे रचून तब्बल साठ तासांच्या प्रयत्नानंतर अपह्रत तरुणाची सुखरूप सुटका केली. याप्रकरणी सहा जणांना अटक केली आहे.

हेही वाचा: खडकवासला: सालाबादप्रमाणे यंदाही खडकवासल्यात 'गोधडी महोत्सव'

दिगंबर चितोडिया (वय ३२) असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर याप्रकरणात प्रवीण सुरजसिंग चितोडिया (वय २४, शिंदे ,मारुंजी), वामन मारुती शिंदे (वय ३९), दिलीप सत्तन पासवान (वय ३२), द्रुपचंद श्रीशिवलाल यादव (वय ३८), योगेंद्र श्रीरामचंद्र प्रसाद (वय २५, सर्व रा. फॉरेस्ट नाका , के. बी. रॉड, अंबरनाथ , ठाणे ), संदीप प्रकाश सोनवणे (वय ३८, रा. मोरवली पाडा, अंबरनाथ ईस्ट ) याना अटक केली आहे. २९ सप्टेंबरला सायंकाळी दिगंबर हे मोटारीसह बेपत्ता झाल्याची तक्रार झाल्याची तक्रार भाऊ राजा चितोडिया यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात दिली.

हेही वाचा: कऱ्हाड: बाजार समिती, खरेदी-विक्री संघाने सोयाबीन खरेदी करावी

पोलिस त्यांचा शोध घेत असताना पहाटे पाचच्या सुमारास दिगंबर यांच्या मोबाईल क्रमांकावरून राजा याना फोन आला. 'दिगम्बर याला जिवंत सोडायचे असेलत तर पंचवीस लाख रुपये आम्ही सांगेल त्याठिकाणी आणून द्या' अशी मागणी केली. याबाबत राजा यांनी पोलिसांना कल्पना दिली. त्यानंतर पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवली. ठीकठिकाणी पथके रवाना केली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे एक पथक ठाणे येथील अंबरनाथ पाठवले.

दरम्यान, दिगंबर यांच्या भावाच्या फोनवर पुन्हा फोन आला. किती पैसे जमा झाले विचारले व पैसे जमा झाले असतील तर पैसे घेऊन पुणे स्टेशन परिसरात बोलविले. त्यानंतर पोलिसांनी बनावट नोटा व चलनातील नोटा मिळून वीस लाख रुपयांचे बंडल तयार केले. व राजा यांना तेथे पाठवून सापळा रचला. मात्र, आरोपींनी पुन्हा फोन केला नाही.

हेही वाचा: पुणे: शहरातील भाजी मार्केट आता दिवसभर सुरु राहणार

त्यानंतर पुन्हा राजा यांना आरोपींच्या फोन वाट पाहण्यास सांगितले. त्यानुसार ३० सप्टेंबरला सायंकाळी सातला आरोपीचा फोन आला. 'पोलिसांना कळविले तर दिगंवरला जिवंत परत पाठवणार नाही' अशी धमकी दिली. त्यानंतर मध्यरात्री दीड वाजता फोन करून लोणावळ्याला पैसे घेऊन बोलविले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला.

राजा यांच्या दुचाकीवर एक सध्या वेशातील पोलिसाला पाठवले. तर इतर पथके परिसरात होती. दरम्यान, खोपोली व लोणावळा पोलिसांनी दिगंवर यांच्या मोटारीचा शोध घेतला. त्यानंतर मोटारीचा गुपचूप पाठलाग सुरु झाला. दरम्यान, दिगंबर यांची मोटार शिळफाटा येथे आली असता पिंपरी - चिंचवड पोलिसांनी खोपोली पोलिसांच्या मदतीने पाच आरोपीना ताब्यात घेऊन दिगंबर यांची सुटका केली.

अंबरनाथला बंद खोलीत ठेवले डांबून

मारुंजी येथे राहणारा प्रवीण चितोडिया या कटाचा मुख्य सूत्रधार आहे. त्याच्या सांगण्यावरून अपहरण केलेल्या दिगंबर याना इतर आरोपींनी अंबरनाथला बंद खोलीत डांबून ठेवले.

loading image
go to top