esakal | जम्बो रुग्णालयांची पिंपरी महापौरांकडून पाहणी; अधिकाऱ्यांना केल्या सूचना
sakal

बोलून बातमी शोधा

जम्बो रुग्णालयांची पिंपरी महापौरांकडून पाहणी; अधिकाऱ्यांना केल्या सूचना

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने ऑटो क्लस्टर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या २०० बेडच्या आय.सी.यु., ऑक्सिजन व कोविड 19 हॉस्पिटल आणि आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथील जम्बो रुग्णालयाची आज महापौर उषा ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांनी समक्ष जाऊन पाहणी केली.

जम्बो रुग्णालयांची पिंपरी महापौरांकडून पाहणी; अधिकाऱ्यांना केल्या सूचना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने ऑटो क्लस्टर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या २०० बेडच्या आय.सी.यु., ऑक्सिजन व कोविड 19 हॉस्पिटल आणि आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथील जम्बो रुग्णालयाची आज महापौर उषा ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांनी समक्ष जाऊन पाहणी केली. या पाहणीनंतर ऑटो क्लस्टर या ठिकाणी रुग्ण दाखल करण्यास सुरुवात झाली असुन, ऑक्सिजन आवश्यक असलेल्या १२ रुग्णांना दाखल करुन घेण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, नोडल अधिकारी सुनिल अलमलेकर आदी अधिकारी उपस्थित होते. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गैरव्यवहाराचा ठपका

शहरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व रुग्णसंख्या लक्षात घेता कोरोना रुग्णांसाठी वेळीच ऑक्सिजन बेड उपलब्ध व्हावे यासाठी महापालिकेच्या वतीने ऑटो क्लस्टर येथे ५० आय.सी.यु व १५० ऑक्सीजन बेडचे कोविड 19 हॉस्पिटल व महाराष्ट्र शासनाकडुन आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे 816 बेडचे जम्बो रुग्णालय उभारण्यात आले आहे. या दोन्ही रुग्णालयांची आज महापालिका पदाधिकारी, अधिकारी यांनी पाहणी केली. या प्रसंगी पुणे येथील झालेली घटना विचारात घेऊन येथे दाखल होणाऱ्या रुग्णांवर वेळीच उपचार व्हावेत व रुग्णांसाठी असलेल्या सुविधांमध्ये कुठल्याही प्रकारचा कामचुकारपणा होणार नाही. 

शिक्षकदिनाच्या पुरस्कारांनाही कोरोनाचा 'संसर्ग'

तसेच, रुग्णांची हेळसांड होणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात यावी. त्याचबरोबर गोळ्या, औषध, लॅब, ऑक्सिजन पुरवठा वेळेत उपलब्ध करुन देण्याबाबतचे सक्त आदेश संबधित अॅडमिस्ट्रेशन व अतिरिक्त आयुक्त, महापालिकेचे नोडल अधिकारी सुनिल अलमलेकर यांना महापौर उषा उर्फ माई ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांनी दिले. तसेच कोरोना बाधित रुग्णांना दिलासा देण्याचे कामही डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी करावे अशा सुचनाही यावेळी देण्यात आल्या. तत्पुर्वी सातारा जिल्हाधिकारी व अतिरिक्त जिल्हाधिकारी तसेच जिल्हाधिकारी कोल्हापुर व कोल्हापुर महापालिका आयुक्त यांनी ऑटो क्लस्टर येथील कोविड हॉस्पिटलची पाहणी करुन नियोजनाबाबत समाधान व्यक्त केले, अशी माहिती यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिली.

loading image