esakal | पिंपरी : ‘टेस्टिंग’मुळ उद्देशालाच हरताळ; चाचणी अहवाल मिळतोय उशिरा
sakal

बोलून बातमी शोधा

Report

पिंपरी : ‘टेस्टिंग’मुळे उद्देशालाच हरताळ; चाचणी अहवाल मिळतोय उशिरा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : शहरात कोरोना संशयित रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी केल्यानंतर पुढील चार ते पाच दिवस त्यांचा अहवालच प्राप्त होत आहे. दरम्यानच्या काळात ही मंडळी टेस्ट करून बाहेर फिरत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून अनेकांना संसर्गाचा ‘प्रसाद’ वाटला जात असल्याचे वास्तव आहे. यामुळे रुग्णांचा शोध घेऊनही केवळ अहवाल वेळेवर मिळत नसल्याने टेस्टिंग व ट्रेसिंगच्या मुळे उद्देशालाच हरताळ फसला जात असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा: पिंपरी-चिंचवडमध्ये १७६ नवीन रुग्ण

सध्या कोरोनाचा दैनंदिन रुग्णसंख्या १५० ते १४१ च्या घरात पोचली आहे. शहरात आतापर्यंत कोरोनाची बाधा झालेल्यांचा आकडा २७,०६१० वर पोचला असून, ४४०४ जणांचा बळी गेला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता समूह संसर्ग टाळण्याच्या उद्देशाने महापालिकेकडून कोरोनाबाधित रुग्ण व त्यांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेऊन त्यांची चाचणी करण्यात येते. त्यासाठी ‘टेस्टिंग’, ‘ट्रेसिंग’ व ट्रीटमेंट ही त्रिसूत्री निश्चित करण्यात आली आहे. दररोज १५०० ते २००० वर चाचण्या होतात. पण कमी मनुष्यबळ असल्यामुळे वायसीएममधील लॅबवरही ताण वाढला असल्याचे कर्मचारी सांगतात. परंतु, चाचणीसाठी येणाऱ्या स्वॅब नमुन्यांची संख्या वाढल्यामुळे यंत्रणा तोकडी पडत आहे. नमुने दिल्यानंतर प्रत्यक्ष अहवाल येण्यास ५ ते ८ दिवसांचा कालावधी लागत असल्याची तक्रारी नागरिक करत आहेत. स्वॅब दिल्यानंतर चाचणी अहवाल माहिती व्हायला किंवा आरोग्य यंत्रणेचा फोन जायला किमान चार ते पाच दिवस लागत आहेत. तोवर या पॉझिटिव्ह नागरिकांचा सर्वत्र मुक्त संचार झालेला असतो. यात यंत्रणेची दिरंगाई असल्याने कोरोना कसा रोखणार, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. इतका वेळ कोणी घरात बसून राहात नाही, लोक टेस्ट करून बाहेर फिरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा: Pune : पुणे विद्यापीठात ‘स्मार्ट ट्रेनिंग’ सुरू

भरती झाल्यानंतर येतो फोन

दरम्यानच्या काळात काही रुग्ण लक्षणांवरून रॅपीड ॲन्टिजेन चाचण्यांच्या आधारे स्वत:ला कोविड रुग्णालयात दाखल करून घेतात किंवा होम आयसोलेशनचा पर्याय निवडत आहेत. दाखल झाल्यानंतर आरोग्य विभागातून पॉझिटिव्ह असल्याचा फोन आल्याची अनेक उदाहरणे आहेत. तिथे मॅन पॉवर वाढवली तर रिपोर्ट लवकर मिळून उपचार सुरु करून रुग्ण संख्या आटोक्यात राहील.

हेही वाचा: Akurdi : सजावटीसाठी तोरण, फुलांना पसंती

निगेटिव्ह असल्याचा अहवालच मिळत नाही

स्वॅब दिल्यानंतर आरटीपीसीआर चाचणीमध्ये एखादा रुग्ण निगेटिव्ह असेल, तर त्याला तसा अहवाल मिळणे किंवा मोबाईलवर मेसेज जाणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र निगेटिव्ह असलेल्यांना कोणत्याही प्रकारचा निरोप दिल्या जात नाही किंवा अहवालही मिळत नाही. चाचणी केल्यानंतर संबंधित व्यक्तीची प्रचंड घालमेल होत असते.

loading image
go to top