पिंपरी : ‘वायसीएम’मध्ये विशेष तज्ज्ञांची गरज

पिंपरी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात काही आजारांतील गंभीर रुग्णांवर उपचार होऊ शकत नाहीत.
YCM Hospital
YCM HospitalSakal

पिंपरी - महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात काही आजारांतील गंभीर रुग्णांवर उपचार होऊ शकत नाहीत. अपघात, सर्पदंश, विषप्राशन, न्यूमोनिया, हृदयविकार झटका, अति उच्चदाब मधुमेह, पक्षघात यावरील रुग्णांना पुढील उपचारासाठी आपत्कालीन विभागातून खासगी किंवा पुण्यातील शासकीय रुग्णालयात पाठवावे लागते. तज्ज्ञ डॉक्टर व सुपर मल्टिस्पेशालिटी उपचार सेवा नसल्याने ही परिस्थिती उद्बवली आहे. साहजिकच खासगी किंवा इतर शासकीय रुग्णालयात धाव घेण्याचे प्रसंग ऐनवेळी नातेवाइकांवर येत आहेत. सात वर्षात १४ हजार जणांना इतरत्र हलविल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.

सध्या वायसीएमध्ये औषधोपचार, बालरोग, त्वचारोग, छातीरोग, अस्थिरोग, मेंदूविकार, मूत्रविकार, हृद्ययरोग, नेत्रविकार, कान-नाक-घसा विकार तज्ज्ञ आहेत. हे ब्रॉडस्पेशालिटी पद्धतीचे उपचार सध्या रुग्णालयात होत आहेत. परंतु, यातही बालरोग मानसोपचार तज्ज्ञ नाही. पदव्युत्तरसाठी महापालिकेने १७ प्रोफेसर घेतले. परंतु, आकृतिबंधातील ३४ मंजूर पदांपैकी १४ वैद्यकीय अधिकारी व सल्लागार पदे भरली गेली. उर्वरीत पदे रिक्त आहेत. त्यामुळे मनुष्यबळ अपुरे पडत आहे. यातही मायक्रो सर्जरीसाठी तज्ज्ञ नसल्याने रुग्णांची फरपट होत आहे.

उपाय काय

  • पॅनेल डॉक्टर नेमून त्यांच्या पगारात वाढ करणे

  • निवासी डॉक्टरांवर कारभार न सोपविता सेवानिवृत्त, विभागप्रमुख व तज्ज्ञ डॉक्टरांचा पुरेपुर अनुभव घेणे

  • खासगी प्रॅक्टिस करणाऱ्यांवर कारवाई करणे

  • डॉक्टरांनी राजकारण आणि अर्थकारण न करता वैद्यकीय सेवा करणे

म्हणून विशेष तज्ज्ञ मिळत नाहीत

  • अपुरा पगार

  • रुग्णसंख्या जास्त

  • बायोमेट्रिक व इतर अटी शर्ती

  • वेळेवर पगार जमा न होणे

YCM Hospital
पिंपरी परिसरात मुसळधार; रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी

या विशेष तज्ज्ञांची गरज

सुपर स्पेशालिटीतील फिजिशिअन, मेंदू सर्जन, मूत्राशय विकार, किडनी, रक्तविकार, पोटविकार, पोटविकार, भूल, कर्करोगविकार, क्ष किरण

आकडेवारी

वर्ष बाहेर पाठवलेली रुग्णसंख्या

२०१५ १,४८३

२०१६ १,००६

२०१७ १,४३१

२०१८ २,६१५

२०१९ ३,५३९

२०२० २,४४६

२०२१ २४ सप्टेंबरपर्यंत २२५८

एकूण १४,७७८

सध्या रुग्णांच्या खाटांची संख्या अपुरी पडत आहे. विशेष तज्ज्ञ सर्जनची गरज आहे. सुपर स्पेशालिटीमधील मेंदूविकार तज्ज्ञ व प्लास्टिकसर्जन हे दोन डॉक्टरही पूर्ण वेळ नाहीत. अशा विविध प्रकारच्या सुपर स्पेशालिटीमधील २३ तज्ज्ञ डॉक्टरांची गरज वायसीएमला आहे. त्यानंतर रुग्ण बाहेर पाठविण्याची वेळ येणार नाही.

- डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com