पिंपरी-चिंचवड : लॉकडाउनमध्ये पीएमपी बससेवा सुरू राहणार का? वाचा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जुलै 2020

- पीएमपीच्या 80 बसेस राहणार बंद
- प्रतिदिन 30 लाखांचे नुकसान

पिंपरी : पीएमपीची रुतलेली चाके रुळावर येण्यास आता कुठे सुरुवात झाली होती. मात्र, प्रवाशांसाठी सुरू केलेली बससेवा पुन्हा ठप्प झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातल्या विविध 30 मार्गांवर धावणाऱ्या पीएमपी बसेसची सेवा 14 जुलैपासून बंद राहणार आहे. अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व बस पुढील आदेश येईपर्यंत धावणार नसल्याचे पीएमपी प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

लॉकडाउन काळात पिंपरी-चिंचवडमध्ये काय सुरू, काय बंद? वाचा सविस्तर

आयटी कंपन्यांसाठी हे आहेत लॉकडाउनचे नियम

पिंपरी-चिंचवड महापालिका लॉकडाउनच्या निर्देशानुसार बसेसची सुविधा बंद राहणार आहे. सार्वजनिक वाहतुकीला परवानगी नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वसामान्य प्रवाशांकरिता बसेस सेवा सुरू करण्यात आली होती. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन सुरू होते. मास्क अनिवार्य करण्यात आले होते. सर्व काळजी घेतली जात आहे. परंतु, कोरोना संसर्ग जलद गतीने वाढत आहे. त्यामुळे बस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

निगडी, भोसरी, चिंचवड येथील पास केंद्र बंद राहणार आहेत. फक्त अत्यावश्‍यक सेवेसाठी पास देण्यात येतील. इतर सर्व पास केंद्र बंद आहेत. वाहक व चालक यांना कामावर हजर राहता येणार नाही. या कालावधीत पीएमपीला प्रतिदिन 30 लाखांचा फटका बसण्याची शक्‍यता असल्याचे वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMP bus service will be closed from July 14