पिंपरी-चिंचवड : चिखलीत सात तासांपासून वीज गायब; नागरिकांच्या कामांचा खोळंबा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 September 2020

चिखली साने चौक व आजूबाजूच्या परिसरात सकाळी आठ वाजल्यापासून वीजपुरवठा खंडित झाला आहे.

पिंपरी : चिखली साने चौक व आजूबाजूच्या परिसरात सकाळी आठ वाजल्यापासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. गेल्या सात तासांपासून वीज नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. सायंकाळी पाऊस आणि दुपारच्या प्रहरात कडाक्‍याचे ऊन पडत असल्याने नागरिकांचा जीव कासावीस होत आहे. वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांची देखील तारांबळ उडत आहे. 

पिंपरी-चिंचवड : दापोडीतील हॅरिस पूल आजपासून वाहतुकीसाठी खुला

महावितरणचे कामकाज दिवस-रात्र सुरूच आहे. मात्र, अवेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना पूर्व कल्पना नसते. त्यामुळे नागरिकांच्या कामांचा खोळंबा होत आहे. बऱ्याच जणांचे कार्यालय वीज पुरवठ्याअभावी बंद करावी लागत आहेत. त्यात कोरोना आणि लॉकडाउननंतर उद्योगांची बसलेली घडी अजून मार्गावर येण्यास बराच वेळ लागत आहे. अशा परिस्थितीत बत्ती गुल झाल्यास खोळंबा होत आहे. 

भामा आसखेडमधून पिंपरी-चिंचवडसाठी जलवाहिनी टाकण्याकरिता 162 कोटींचा निधी मंजूर

दरम्यान, परिसरात वीजतारांच्या तपासणीचे काम सुरू आहे. तसेच क्रेटिंगचे काम अर्ध्या तासात पूर्ण होईल. लवकरच वीज पुरवठा सुरळीत होईल, असे चिखलीतील महावितरणचे उपविभागीय अभियंता उमेश कावळे यांनी सांगितले.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: power cut down in chikhali from seven hours