पिंपरी चिंचवडमध्ये एकाच दिवशी पाच दारूअड्ड्यावर छापे

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 December 2020

निगडीतील ओटास्कीम येथील दळवीनगरमधील पत्राशेडमध्ये बाबासाहेब सुभाष मांजरे (वय 36) हा बेकायदा दारू विक्री करीत होता. याबाबत पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी (ता.30) सायंकाळी साडेसातच्या सुमारास छापा टाकून तीन हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पिंपरी: पिंपरी, चिंचवड, वाकड, सांगवी पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सोमवारी (ता.30) एकाच दिवशी पाच दारूअड्ड्यावर छापे टाकले. या कारवाईत पंधरा हजारांचा दारूसाठा जप्त केला करण्यात आला. 

चिंचवड पोलिसांनी दळवीनगर झोपडपट्टीच्या मागील बाजूस सुरू असलेल्या दारूअड्ड्यावर छापा टाकून गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या शंकर तिमाप्पा केंचमल (वय 38, रा. भोईरनगर, चिंचवडगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला. त्याच्याकडून 1 हजार 600 रुपयांची 15 लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

निगडीतील ओटास्कीम येथील दळवीनगरमधील पत्राशेडमध्ये बाबासाहेब सुभाष मांजरे (वय 36) हा बेकायदा दारू विक्री करीत होता. याबाबत पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी (ता.30) सायंकाळी साडेसातच्या सुमारास छापा टाकून तीन हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सांगवी पोलिसांनी रहाटणी गावठाण येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकून 6 हजार 860 रुपयांचा दारूसाठा जप्त केला. याप्रकरणी बाळू वसंत म्हसकर (वय 30, रा. श्रीहरी कॉलनी, पिंपळे सौदागर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 14 हजार 560 रुपयांचा दारूसाठा जप्त केला आहे. 

पदवीधर, शिक्षकांना मतदानासाठी विशेष रजा मंजूर होणार - शिक्षणाधिकारी

दोन महिलांवर गुन्हा 
प्लॅस्टिकच्या कॅन मधून गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या सुनीता संजय रावळकर (वय 37, रा. संत ज्ञानेश्वर कॉलनी, थेरगाव) या महिलेवर वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीकडून 800 रुपये किंमतीची दहा लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली आहे. 

पिंपरी पोलिसांनी देशी-विदेशी दारू विक्री करणाऱ्या माया राकेश भाट (वय 33, रा. इंदिरानगर, चिंचवड) या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी महिला इंदिरानगर येथे देशी-विदेशी दारूच्या बाटल्या विकत होती. तिच्याकडून पोलिसांनी दीड हजारांचा दारूसाठा जप्त केला आहे.

कापुरव्होळ ज्वेलर्स दरोड्यासह चौदा गुन्ह्यातील आरोपी ताब्यात
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raids on five liquor spot in Pimpri Chinchwad on the same day