esakal | सेफ्टी टॅंकलाच हवाय ‘ऑक्सिजन’
sakal

बोलून बातमी शोधा

Oxygen Tank

सेफ्टी टॅंकलाच हवाय ‘ऑक्सिजन’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - वायसीएम रुग्णालयाला (YCM Hospital) ऑक्सिजन पुरवठा (Oxygen Supply) करणाऱ्या सेफ्टी टॅंकमधून (Safety Tank) बुधवारी सायंकाळी सात वाजता ऑक्सिजन गळती (Oxygen Leakage) झाली. कोणतीही जीवित हानी झाली नाही. अन्यथा कोविड रुग्णांच्या (Covid Patient) जिवावर बेतले असते. मात्र, या टॅंकचे कंत्राट गेल्या बारा वर्षांपासून एका खासगी कंपनीला दिले आहे. ऑक्सिजन रिफीलिंग करताना प्रमाणापेक्षा जास्त दाब वाढून सेफ्टी व्हॉल्व्ह लिकेज झाला. परंतु, रुग्णांचा जीव टांगणीला लावणाऱ्या या सेफ्टी टॅंकची देखभाल-दुरुस्ती नियमित होणे गरजेचे आहे. परिणामी, टॅंकच्या देखभाल-दुरुस्तीकडेच कानाडोळा झाल्याने मोठा प्रसंग ओढवला. दुसऱ्या दिवशी गुरूवारी (ता. १०) एकूण परिस्थिती निवळल्याचे दिसले. (Safety Tank Issue Oxygen YCM Hospital)

रुग्णालयाच्या परिसरात ऑक्सिजन प्लॅंट आहे. कोविडच्या रुग्णांसाठी सध्या हा वापरला जातो. दहा टन क्षमतेचे टॅंक आहेत. सायंकाळी द्रवरूप ऑक्सिजन भरण्यासाठी ऑक्सिजन वाहन त्या ठिकाणी पोहचले. टॅंक भरत असताना दाब ७.५ पर्यंत होता. ऑक्सिजन भरण्याचे काम दीड तास सुरू होते. दरम्यान, हा दाब अचानक ८.५ च्या पुढे गेला. तो क्षमतेपेक्षा दहा किलोग्रॅमच्या आतच ऑपरेट झाला. तशी बारा किलोग्रॅमपर्यंत क्षमता आहे. परंतु, व्हॉल्व्हच्या बिघाडामुळे टॅंक पूर्णपणे भरत येत असतानाच जोरात आवाज झाला. टॅंकभोवती मोठ्या प्रमाणात बर्फ जमा झाला होता. तो काढणे गरजेचे होते. या सर्वांचा ताळमेळ या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना साधता आला नाही. त्यामुळे, वायू वातावरणात वेगाने पसरत गेला.

हेही वाचा: खासगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांकडून उकळले तब्बल ६ कोटी

काय घडले

ऑक्सिजन सेफ्टी टॅंकमधून शिट्टीसारखा आवाज आला. आवारातील लोकांनी परिसरातून पळ काढला. टॅंकवर काम करणारा कर्मचारी देखील भांबावला. अवघ्या पाच मिनिटांत वातावरणात वायू पसरल्याने समोरचे काहीच दिसेनासे झाले. तेवढ्यात अग्निशमन दलाची गाडी पोहोचली. रुग्णांच्या नातेवाईकांना काहीच समजत नव्हते. काही वेळात आयुक्त, अधिष्ठाता व प्लॅंटच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.

सद्यस्थिती

  • तीन शिफ्टमध्ये तीन फिटर, एक इंजिनिअर

  • सीसीटिव्ही कॅमेरा व सुरक्षारक्षक

  • रुबीएलकेअर, आयसीयू व कोविड रुग्णांच्या १०० बेडला ऑक्सिजन

  • कोविड सेंटरलाही ऑक्सिजन पुरवठा

ठेकेदाराच्या मते

अग्निशामक दल पोचण्यापूर्वीच हवा आटोक्यात आणली. अवघ्या १५ मिनिटांत काम सुरळीत सुरू झाले. शिफ्टमध्ये काम सुरू असते. वेळोवेळी देखभाल केली जाते. व्हॉल्व्ह दुरुस्त करेपर्यंत हवा मोठ्या प्रमाणात जमा झाली.

हेही वाचा: लग्नास होकार न मिळाल्याने तरूणाची आत्महत्या

कोविड काळात सर्वजण प्राण पणाला लावून काम करीत आहेत. दाब वाढल्याने हवा बाहेर आली होती. ही ऑक्सिजन गळती नाही. व्हॉल्व्ह हा सुरक्षेसाठीच आहे. दर तीन महिन्यांनी देखभाल दुरुस्ती होते. पर्यायी वापराची व्यवस्था आहे. हवा मोठ्या प्रमाणात जमा झाल्याने कामावरील कर्मचारी भांबावून गेला. त्याला सुचले नाही.

- सुनील लोंढे, बायोमेडीकल इंजिनिअर, वायसीएम

सेफ्टी व्हॉल्व्ह हा तातडीसाठीच वापरला जातो. याकडे दुर्लक्ष होता कामा नये. स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दहा किलोग्रॅमच्या आत दाब नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. तो झाला नाही. यासाठी वेळोवेळी गॅस कीट, डायट्राम रिंग, वॉशर, रिंग तपासणी करणे गरजेचे आहे.

- किरण गावडे, मुख्य अग्निशामक अधिकारी