धक्कादायक: सांगवीत पत्नीच्या प्रियकराचा भरदिवसा कोयत्याने वार करून खून 

मंगेश पांडे
Monday, 14 September 2020

आरोपीच्या पत्नीचे लग्नापूर्वी सौरभ याच्याशी प्रेमसंबंध होते. या रागातून आरोपीने पत्नीच्या प्रियकरावर रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास साथीदाराच्या मदतीने  संगावीतील जिल्हा रुग्णालयाच्या आवारात कोयत्याने सपासप वार केले.

पिंपरी: लग्नापूर्वी प्रेमसंबंध असलेल्या पत्नीच्या प्रियकराचा भरदिवसा कोयत्याने वार करून खून करण्यात आला. ही घटना सांगवी येथे घडली. हल्ल्यानंतर आरोपी फरारी झाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा

सौरभ व्यंकट जाधव (वय 28 ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मृताचा भाऊ सुशांत व्यंकट जाधव (रा. संजयनगर, औंध) यांनी फिर्याद दिली आहे.

आरोपीच्या पत्नीचे लग्नापूर्वी सौरभ याच्याशी प्रेमसंबंध होते. या रागातून आरोपीने पत्नीच्या प्रियकरावर रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास साथीदाराच्या मदतीने  संगावीतील जिल्हा रुग्णालयाच्या आवारात कोयत्याने सपासप वार केले.

कोरोनानंतर मुलांमधील "पिम्स' आजारासंबंधी डॉक्‍टरांचा सल्ला, वाचा सविस्तर

भरदिवसा ही घटना घडली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने सौरभ यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. फरारी आरोपींचा शोध सुरु असून सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
 

पुणेकरांनो, "आरटीओ'चे कामकाज आता सकाळी आठपासूनच ! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Sangvi wife boyfriend was stabbed to death by sharp weapons