
पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नववी व दहावीच्या शाळा आणि अकरावी-बारावी कनिष्ठ महाविद्यालये 13 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला.
पिंपरी - शहरातील कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नववी व दहावीच्या शाळा आणि अकरावी-बारावी कनिष्ठ महाविद्यालये 13 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा व कनिष्ठ महाविद्यालये बंद आहेत. परिस्थितीचा आढावा घेऊन पालकांच्या संमतीने शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू होत्या. याबाबतचा निर्णय सोमवारी (ता. 30) घेण्यात येणार होता. मात्र, पालकांच्या संमतीने शाळा उघडणे चुकीचे होवू शकते, असे पत्र महापौर उषा ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी आयुक्त हर्डीकर यांना दिली होते. त्यात म्हटले होते की, शाळा सुरू करून आपण प्रशासन म्हणून मुलांच्या आरोग्याशी खेळ करतो की काय? असा प्रश्न पालकांच्या मनामध्ये निर्माण होवू लागला आहे. डिसेंबर महिन्याच्या 13 तारखेपर्यंत शहरातील कोरोना रुग्णांची संख्या व शहरातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच शहरातील शाळा सूरू कराव्यात.
जांबेत पैशांच्या कारणावरून लेबर कॉन्ट्रॅक्टरचा खून
दरम्यान, परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घ्यावा, असा आदेश राज्य सरकारने दिला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना परिस्थिती लक्षात घेवूनच शाळा उघडण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.
शिक्षकांची तपासणी आवश्यक
शाळाव कनिष्ठ महाविद्यालयांच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी करणे आवश्यक आहे. त्यानुसार, रॅपिड अँटिजेन टेस्ट करून कुठलीही लक्षणे नसणाऱ्या शिक्षकांना कामावर हजर होण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. तसेच, विद्यार्थ्यांच्या पालकांचे संमतीपत्र भरून घेतले जाणार आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी शाळा निर्जंतुकीकरण, तापमान मोजणीसाठी गन, डिजिटल थर्मामिटर, हात धुण्याची व्यवस्था, सोशल डिस्टनसिंग प्लॅन इत्यादी गोष्टींची पूर्तता करण्यात येणार आहे. काही शाळांमधील शिक्षकांची रॅपिड अँटिजेन टेस्ट अद्याप बाकी असल्याने व सद्यस्थितीत कोविड रुग्णांच्या संख्येमध्ये होत असलेली वाढीची परिस्थिती लक्षात घेता 13 डिसेंबरपर्यंत शहरातील नववी ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालये बंदचा निर्णय घेण्यात आला आहे.
दहशत माजविलेल्या ठिकाणीच पोलिसांनी गुंडांना पायी फिरवलं; निगडी ओटास्कीम गोळीबार प्रकरण
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तपासणी बाकी आहे. तसेच, अनेक पालकांचाही मुलांना शाळेत पाठवण्यास विरोध आहे. या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्याच्या निर्णयाबाबत पुनर्विचार केला जात आहे. त्यानुसार 13 डिसेंबरपर्यंत शाळा व कनिष्ठ महाविद्यालये बंद राहणार आहेत.
- श्रावण हर्डीकर, आयुक्त, महापालिका
Edited By - Prashant Patil