यंदाचा पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सव असा पाहा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 September 2020

पिंपरी-चिंचवड फिल्म क्‍लबच्या वतीने भरवण्यात येणारा यंदाचा दुसरा पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सव कोरोनामुळे व सरकारच्या नियमावलीनुसार एक ते पाच सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन भरविण्यात येणार आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड फिल्म क्‍लबच्या वतीने भरवण्यात येणारा यंदाचा दुसरा पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सव कोरोनामुळे व सरकारच्या नियमावलीनुसार एक ते पाच सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन भरविण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाच्या युट्यूब चॅनेलवर लघु चित्रपट पाहता येणार आहे. यामध्ये प्रेक्षकांना उत्कृष्ट लघु चित्रपट पहावयास मिळणार आहेत. 

पिंपरी-चिंचवडमध्ये वैद्यकीय कचरा वाढतोय; सहा महिन्यांत कोविडचा 'एवढा' कचरा जमा

विदेश आणि देशातील विविध राज्यांमधील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सवासाठी सहभागी झाले होते. यामध्ये प्रामुख्याने यूएस, स्पेन, इराण, बेल्जियम, मलेशिया, इजिप्त, स्विझर्लंड, व्हिएतनाम, साउथ कोरिया, जर्मनी, सिंगापूर, बांगलादेश; तर भारतातील केरळ, दिल्ली, आंध्रप्रदेश, पश्‍चिम बंगाल, गोवा, उत्तर प्रदेश, काश्‍मीर, मुंबई, पुणे, नगर, सोलापूर, औरंगाबाद आणि शहरातील शॉर्ट फिल्मपैकी परीक्षकांनी निवडलेल्या शॉर्ट फिल्म प्रेक्षकांना ऑनलाइन पाहावयास मिळणार आहेत. 

गणपती विसर्जनानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये 'हा' झाला बदल

पिंपरी-चिंचवडकरांनो! महापालिका आयुक्तांनी लागू केली नवीन नियमावली

पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे. यंदा सुदिप्तो आचार्य आणि अभिजित देशपांडे हे परीक्षक म्हणून लाभले आहेत. बैठकीला फेस्टिव्हलचे क्रिएटिव्ह डायरेक्‍टर हर्षवर्धन धुतुरे, पी.सी.एम.सी. फिल्म क्‍लबचे संचालक अविनाश कांबीकर व दत्ता गुंड, फेस्टिव्हलचे प्रमुख मार्गदर्शक पिंपरी-चिंचवडचे सांस्कृतिक सल्लागार प्रवीण तुपे, पी.सी.एम.सी. फिल्म क्‍लबचे सदस्य उपस्थित होते, अशी माहिती फेस्टिव्हलचे संचालक रमेश होलबोले यांनी दिली.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: second pimpri chinchwad international short film festival online