

Leopard Movement Detected in Shirgaon Village
Sakal
शिरगाव : मागील दोन दिवसांपासून बिबट्याचा वावर आढळून आला आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषत: खेड, जुन्नर तालुक्यांतील घटना ताज्या असतानाच आता शिरगावात बिबट्याचा वावर दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचीही चिंता वाढली आहे. तर, सकाळच्या सत्रातील शाळांमध्ये विद्यार्थी संख्या रोडावल्याचे शिक्षकांनी सांगितले. शिरगाव परिसरात अनेक नागरिकांना बिबट्या दिसल्याची माहिती पोलिस पाटील समीर शेख यांनी पोलिस ठाणे आणि मावळ वनविभागाला दिली. त्यावर प्रशासनाने तातडीने या परिसरात भेट देत नागरिकांना सजग केले. ‘‘सध्या शेतात ऊस आणि भाताचे पीक आहे.