पिंपरी-चिंचवडकरांनो कोरोनाला गांभीर्याने घ्या; नागरिकांकडून आजही तीच चूक 

पिंपरी-चिंचवडकरांनो कोरोनाला गांभीर्याने घ्या; नागरिकांकडून आजही तीच चूक 

पिंपरी : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महापौर उषा ढोरे व महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्रत्येक रविवारी व गुरुवारी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवडकरांना गेल्या शनिवारीच (ता. 4) केले होते. मात्र, रविवारी (ता. 5) कोणीही त्याचे पालन केले नाही. गुरुवारी (ता. 9) जनता कर्फ्यू पाळावा, या बाबत बुधवारी पुन्हा आवाहन केले. मात्र, नागरिक काही ऐकायला तयार नाहीत. चिखली, दिघी, पिंपळे गुरव, नवी सांगवी, जुनी सांगवी आदी परिसर वगळता सर्वच ठिकाणी दुकाने सर्रासपणे सुरू होती. लोक रस्त्यावर होती. आज गुरुवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकूण 5973 जण पॉझिटीव्ह आढळले आहेत, तर आतापर्यंत 82 जणांचा बळी गेला आहे. आज आतापर्यंत 298 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे 'पिंपरी-चिंचवडकरांनो! आता तरी गांभीर्याने घ्या', असे म्हणण्याची वेळ आली आहे. 

भोसरी, इंद्रायणीनगर परिसरातील सर्वच व्यवहार सुरळीत होते. स्पाइन रस्ता, जयगणेश साम्राज्य, चिंचवड पूर्णानगर, शाहूनगर, चिंचवड स्टेशन, मोरवाडी, अजमेरा आदी भागात दुकाने खुली होती. लोक रस्त्यावर होते. भोसरी व इंद्रायणीनगर परिसरातही हीच स्थिती होती. 

दिघी, सांगवीकरांचा आदर्श घ्या 

दिघीतील बहुतांश भागात रुग्ण आढळले आहेत. त्यातील अनेक जण बरे होऊन घरी आले आहेत. मात्र, कोरोनाचे गांभीर्य ओळखून त्यांनी जनता कर्फ्यूचे पालन केले. नागरिकांनी गुरुवारीच नव्हे तर, चक्क मंगळवारपासून (ता. 7) गुरुवारपर्यंत (ता. 9) सलग तीन दिवस शंभर टक्के बंद पाळला. तसेच, जुनी व नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसरात जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परिसरातील जीवनाश्‍यक वस्तू सोडून सर्व दुकाने बंद होती. रस्त्यांवर वाहनेही तुरळक होती. 

पिंपिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com