सोसायटीने जपला पोलिसातील माणूस

Kashinath-More
Kashinath-More

तळेगाव स्टेशन - कोरोना लाॅकडाऊन दरम्यान आपत्कालीन सेवेत असल्यामुळे प्रवेश नाकारणा-या सोसायटीच्या रहिवाशांची उदाहरणे समोर आहेत. मात्र बंदोबस्तावर असलेल्या पोलिस कर्मचा-याचे कुटूंबीय घरी नसताना तळेगावातील कृष्णा आकार सोसायटीच्या रहिवाशांनी दोन महीने जेवणाची सोय केली. तसेच वाढदिवसही साजरा करत या कोरोना योद्धयाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात बीट मार्शल पथकात सेवेत असलेल्या पोलिस काॅन्स्टेबल काशिनाथ शंकर मोरे आपल्या कार्यतत्परतेबद्दल सर्वश्रुत आहेत. लाॅकडाऊन जाहीर होण्यापुर्वीच विशेष काळजी म्हणून गर्भवती असलेल्या आपल्या पत्नीसह छोटया मुलीला मोरे यांनी आपल्या इंदापूर तालुक्यातील पळसदेव या गावी सोडले. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कोरोना लाॅकडाऊन जाहीर झाल्यानंतर लागलेल्या निरंतर डयुटीमुळे ३ एप्रिलला मुलगी झाल्याचा आनंद त्यांनी आपल्या कृष्णा आकार सोसायटीच्या रहिवाशांसोबत मिठाई वाटून साजरा केला.

कोरोनाच्या दहशतीमुळे पोलिस, आरोग्यसेविका, डाॅक्टर्स आणि इतर आपत्कालीन सेवेसाठी प्रतिबंधीत क्षेत्रात ये जा करणा-यांना सोसायटीने प्रवेश नाकारल्याच्या घटना सगळीकडे निदर्शनास येत होत्या. मात्र तळेगावातील परांजपे शाळेजवळील कृष्णा आकार सोसायटीच्या रहिवाशांनी मात्र एक वेगळाच आदर्श घालवून दिला.पत्नी गावी असलेल्या पोलिस काॅन्स्टेबल मोरे यांच्या दोन वेळच्या जेवनाची व्यवस्था सोसायटीतील रहिवाशांनी केली. कधी जेवणाचा डबा तर कधी थेट घरात बोलावून गेले दोन महीने जेवणाची घरगुती सोय झाली. कोरोना लाॅकडाऊन दरम्यान नाकाबंदीत जोमाने काम करायला आणखी हुरुप आला.

विशेष म्हणजे डयुटीवरुन घरी गेल्यानंतर स्वतःला पुर्णपणे निर्जंतुकीकरण करुन शेजा-यांच्या आरोग्याची काळजी घेतली. गेल्या ३० मे रोजी मोरे यांचा वाढदिवसही सोसायटीचे अध्यक्ष प्रसन्ना आंधळे तसेच सचिव मारुती लायगुडे आणि रहिवाशांनी सोशल डिस्टंन्सींग राखत केक कापून साजरा केला. सोसायटीतील महीला मभिनींनी औषण करुन या कोरोना योद्धयाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कुटुंबियांच्या अनुपस्थितीत सोसायटीच्या रहिवाशांनी दिलेल्या या मायेने घरच्यांची उणीव भासू दिली नाही.त्यामुळे भारावलेल्या मोरे यांच्या डोळयांच्या कडा पाणावल्या.

स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेच्या सुरक्षिततेसाठी लढलेल्या कोरोना योद्धा पोलिसांना लाॅकडाऊन कालावधीत बरेवाईट अनुभव आले. पोलिसातील माणूस जाणून घेत कृष्णा आकार सोसायटीच्या रहिवाशांनी दिलेल्या विशेष वागणुकीमुळे निश्चितच पोलिसांचे मनोधैर्य उंचावण्यास मदत झाल्याची कृतज्ञता तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com