पिंपरी : वल्लभनगर आगारातून एसटीच्या 126 फेऱ्या सुरू

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 September 2020

वल्लभनगर आगारातील प्रवाशांमध्ये आता दहा टक्के वाढ झाली आहे.

पिंपरी : वल्लभनगर आगारातील प्रवाशांमध्ये आता दहा टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे एसटी बसच्या एकूण 126 फेऱ्या होत आहेत. त्यात एसटी बसच्या 103 फेऱ्या आणि शिवशाहीच्या 23 फेऱ्या आहेत. सरकारने 22 प्रवाशांची अट रद्द केली आहे. त्यामुळे साध्या गाड्या व शिवशाहीमध्ये आता पूर्ण क्षमतेने प्रवासी भरले जात आहेत, असे वाहतूक निरीक्षक हनुमंत खामकर यांनी सांगितले. 

काय सांगता! परप्रांतीय कामगारांना चक्क विमान तिकिटांची भेट

सध्या वल्लभनगर आगारात बाहेरील मुक्कामी असणाऱ्या 23 शिवशाही बस दाखल आहेत. त्या नगर, सातारा, सोलापूर, निगडी या मार्गावर धावत आहेत. मात्र, आगाराच्या सहा शिवशाही बस अद्यापही धावलेल्या नाहीत. शिवशाहीची प्रवासी क्षमता 44 असून, इतर गाड्यांची 39 व 42 आहे. या गाड्या आता पूर्ण प्रवासी क्षमतेने धावणार आहेत. आगारातून विजापूर, गाणगापूर, दापोली, पंढरपूर, सोलापूर, मुरुम, बेळम या मार्गावरही गाड्या सुरू झाल्या आहेत. 

असे आहे शिवशाहीचे वेळापत्रक 

  • सकाळी : परभणी 5.30, जालना, जाफराबाद 7.15, चाळीसगाव 6.45, आंबेजोगाई 8.15, कुडाळ 6.30, वेंगुर्ला 8, चिपळूण 9.30, औसा 7.45 व 10, निलंगा 8 व 9, 11, मालवण 6.45, सावंतवाडी 6.45. 
  • दुपारी : धुळे 12. 
  • संध्याकाळी : परभणी 7.15, आंबेजोगाई 9.30, जळगाव 7.00, दापोली 8.30, चिपळूण 10, रत्नागिरी 8.15, मालवण 7.20, सावंतवाडी 9. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST bus start 126 rounds from vallabhnagar depo