esakal | पालकांच्या संमतीनेच विद्यार्थी बसणार शाळेत 
sakal

बोलून बातमी शोधा

पालकांच्या संमतीनेच विद्यार्थी बसणार शाळेत 

होणार, होणार, होणार म्हणत वाट बघायला लावलेल्या शाळा सोमवारपासून (ता. 23) सुरू करण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे. त्यानुसार शहरातील महापालिका व खाजगी शाळांनी तयारी सुरू केली आहे. सोमवारपासून केवळ नववी ते बारावीपर्यंतचेच वर्ग सुरू होणार असून त्यासाठी पालकांची संमती आवश्‍यक आहे. त्यांच्या संमतीपत्राशिवाय मुलांना शाळेत प्रवेश दिला जाणार नाही.

पालकांच्या संमतीनेच विद्यार्थी बसणार शाळेत 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - होणार, होणार, होणार म्हणत वाट बघायला लावलेल्या शाळा सोमवारपासून (ता. 23) सुरू करण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे. त्यानुसार शहरातील महापालिका व खाजगी शाळांनी तयारी सुरू केली आहे. सोमवारपासून केवळ नववी ते बारावीपर्यंतचेच वर्ग सुरू होणार असून त्यासाठी पालकांची संमती आवश्‍यक आहे. त्यांच्या संमतीपत्राशिवाय मुलांना शाळेत प्रवेश दिला जाणार नाही. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कायदा व नियमावलीचे पालन करीत सोमवारपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू होणार आहेत. त्याची लगबग शुक्रवारी शहरातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांत बघायला मिळाली. काही शाळांनी पालकांची ऑनलाइन मिटिंग बोलवून मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. सरकारनेही आदेशामध्ये मार्गदर्शक सूचना नमूद केल्याअसून त्यांचे पालन करीत शाळा सुरू केल्या जाणार आहेत. शाळांची साफसफाई व निर्जंतुकीकरण केले जात आहे. शिक्षकांची कोविड चाचणी करण्यात येत आहेत. एका बाकावर एक विद्यार्थी बसविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. 

पिंपरी-चिंचवडमधील उद्योजकांना वीजबिलांचा शॉक; करोडो रुपयांची बिले थकीत 

शहरातील महापालिका व खासगी शाळांमधील सुमारे पाच हजार शिक्षकांची तपासणी करण्यात आली आहे. मुलांच्या सुरक्षेची खबरदारी आम्ही घेणार आहोत. पण, पालकांचे संमतीपत्र आवश्‍यक आहे. शिवाय, मुलांना शाळेत पाठवायचे की नाही, याचा निर्णय सर्वस्वी पालकांनी घ्यायचा आहे. स्कूलबस ऐवजी पालकांनी स्वत- विद्यार्थ्यांची ने-आण करायची, असे एका मुख्याध्यापिकांनी सांगितले. 

पिंपरीत  पोलिस निरीक्षकांच्या अवघ्या सात दिवसांत पुन्हा बदल्या 

प्रश्‍न पालकांचा उत्तर शिक्षकांचे 
प्रश्‍न - शाळा सुरू होत असल्याचा आनंद आम्हाला आहे. पण, शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांची काळजी शाळा व शिक्षकांनी घ्यायला हवी. नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू होणार पण, आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वर्ग कधी सुरू होणार? 
उत्तर - मुलांची आम्ही पूर्ण तऱ्हेने काळजी घेणार आहोत. शाळेत गेल्यानंतर काय काळजी घ्यावी, याची माहिती पालकांनीही मुलांना द्यायला हवी. नववी-बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा प्रतिसाद व संसर्गाचे प्रमाण बघून आठवीपर्यंतच्या वर्गांबाबत सरकार निर्णय घेणार आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शाळांसाठी मार्गदर्शक सूचना 
- शाळांची नियमित स्वच्छता व निर्जंतुकीकरण 
- संसर्ग झालेला असल्यास डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसारच शाळेत प्रवेश 
- सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी आवश्‍यक 
- शाळेत आपत्कालीन गट व स्वच्छता गट स्थापन करणे 

दृष्टिक्षेपात पिंपरी-चिंचवड 
- शहरातील एकूण शाळा - 658 
- नववी ते बारावीच्या खासगी शाळा - 258 
- महापालिका माध्यमिक शाळा - 24 
- महापालिका शाळेतील नववी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी - 4490 
- खासगी शाळांमधील विद्यार्थी - 88,352 
- खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी - 4671 
- महापालिका शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, 229 

असे होईल शिक्षण 
- एका बाकावर एक विद्यार्थी 
- एका दिवशी 50 टक्के विद्यार्थी 
- दुसऱ्या दिवशी 50 टक्के विद्यार्थी 
- शक्‍यतो कठीण विषय शाळेत शिकवणार 
- सोपे विषय ऑनलाइनपद्धतीने शिकविण्याचे नियोजन 
- दररोज केवळ चार तास शाळा

Edited By - Prashant Patil