esakal | रशिया, बाल्टिकमध्ये अडकलेले विद्यार्थी घालतायेत मायदेशी आणण्याची साद
sakal

बोलून बातमी शोधा

रशिया, बाल्टिकमध्ये अडकलेले विद्यार्थी घालतायेत मायदेशी आणण्याची साद
  • सरकारने विद्यार्थ्यांना परत आणण्याची व्यवस्था करण्याची मागणी 

रशिया, बाल्टिकमध्ये अडकलेले विद्यार्थी घालतायेत मायदेशी आणण्याची साद

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड, पुण्यातील विद्यार्थी रशिया आणि बाल्टिक देशामध्ये अडकले आहेत. त्यांनी एअर इंडिया विमानाचे बुकिंग केले होते. मात्र, काही निर्बंधामुळे कंपनीने परतीचा प्रवास रद्द करून पन्नास हजारांची तिकिटे आठ हजार देऊन रद्द केली आहेत. या विद्यार्थ्यांना तुमच्या जबाबदारीवर "तुम्ही खासगी विमानाने भारतात न्या' असे सांगितले आहे. केरळ सरकारने याची दखल घेऊन भारतीय दूतावासाशी संपर्क करून केरळ सरकार स्पेशल स्टाफ नेमून विद्यार्थ्यांना परत आणण्याची व्यवस्था केली आहे. महाराष्ट्राने तशी सोय करावी, अशी रशियात अडकलेल्या आकुर्डीतील आफताब रजमुद्दीन शेख याने विनवणी केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शेख म्हणाला, "कोरोना लाट थोपविण्यासाठी रशिया आणि बाल्टिक देश कडक निर्बंध लादत आहेत. परिणामी विद्यार्थी भारतात परत निघाले आहेत. मात्र त्यांना मायदेशी परत येण्यासाठी भारतातील दूतावास अपेक्षित सहकार्य करीत नसल्याने आम्ही महाराष्ट्रातील (मुंबई, कोल्हापूर, पुणे, पिंपरी-चिंचवड ) 120 विद्यार्थी अडचणीत सापडलो आहोत. मी रशियातील कालिनीग्राड, बाल्टिक फेडरल युनिव्हर्सिटी एमबीबीएस करीत आहे. मी डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) आकुर्डी कार्यालयाशी संपर्क करून सांगितले आहे.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महाराष्ट्र डेमोक्रेटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियाचे पदाधिकारी गणेश दराडे, प्रीती शेखर यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे विद्यार्थ्यांची तिकिटे रद्द न करता एअर इंडियाने त्यांना खास प्रयत्न करून 14 नोव्हेंबरपूर्वी मायदेशी आणावे, अशी विनंती केली आहे. त्यांनी मास्को येथे आफताब शेख यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना कळवा आणि प्रयत्न करा, असे सांगितले आहे. पुणे, मुंबई, पिंपरी-चिंचवडमधील चाळीसहून अधिक विद्यार्थ्यांना पैसे नसल्याने खासगी विमाने परवडत नाहीत. हे विद्यार्थी भारतीय राजदूताशी सतत संपर्क करीत आहेत.