esakal | शाळा बंद, तरी विद्यार्थ्यांना मिळणार पोषण आहार 
sakal

बोलून बातमी शोधा

Students will get nutritious food even if the school is closed

शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत पात्र शाळेतील इयत्ता पहिली ते आठवी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन दिले जाते. शैक्षणिक वर्ष 2020-21 कालावधीसाठी जिल्ह्यामध्ये योजनेची नियमित अंमलबजावणी करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रेय जगताप यांनी दिले आहेत.

शाळा बंद, तरी विद्यार्थ्यांना मिळणार पोषण आहार 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहेत. मात्र, विद्यार्थ्यांना नियमित पोषण आहार मिळणे आवश्‍यक असल्याने सध्याच्या स्थितीत पात्र विद्यार्थ्यांना तांदूळ व अन्न शिजविण्यासाठीच्या खर्चाच्या दराच्या मर्यादेमध्ये धान्यादी मालाच्या स्वरूपात लाभ देण्याचे केंद्र शासनाने निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने राज्यातील विद्यार्थ्यांना योजनेअंतर्गत पोषण आहाराचा लाभ देण्याकरिता तांदूळ व धान्यादी मालाचे वाटप शाळास्तरावर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

बारामतीतील अधिकारी माध्यमांना माहिती देण्यास करताहेत टाळाटाळ

शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत पात्र शाळेतील इयत्ता पहिली ते आठवी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन दिले जाते. शैक्षणिक वर्ष 2020-21 कालावधीसाठी जिल्ह्यामध्ये योजनेची नियमित अंमलबजावणी करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रेय जगताप यांनी दिले आहेत. मागणीनुसार 20 दिवसांच्या आत सार्वजनिक सुटीचे दिवस वगळून तांदूळ व धान्यादी मालाचा पुरवठा पुरवठादाराने शाळास्तरावर करणे अनिवार्य राहणार आहे. शाळास्तरावर वजन करून तांदूळ व धान्यादी माल घेण्यात यावा. माल प्राप्त झाल्यानंतर मुख्याध्यापक व शालेय व्यवस्थापन समिती यांनी मालाचे नियोजन करावे. शाळेमध्ये गर्दी होणार नाही याची दक्षता घेऊन टप्प्याटप्प्याने विद्यार्थी किंवा पालकांना धान्याचे नेहमीच्या प्रमाणात वाटप करावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. मूगडाळ, मसूरडाळ व तूरडाळ यापैकी कोणतीही एक डाळ निवडायची आहे, त्यानंतर हरभरा, चवळी, मटकी आणि अख्खा मूग याऐवजी निवडणे आवश्‍यक असून मालाची मागणी पुरवठादाराकडे नोंदवायची आहे. 

असा मिळणार आहार 
विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या धान्यादी वस्तू पहिली ते पाचवीतील विद्यार्थ्यांना 238 रुपये कमाल खर्चाची मर्यादा राहील, तर सहावी ते आठवीतील विद्यार्थ्यांना कमाल 402 रुपये कमाल खर्चाची मर्यादा असेल. विद्यार्थ्यांना जून ते ऑगस्ट 2020 असा 60 कार्यदिनाकरिता तांदळाची मागणी पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना सहा किलो, तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नऊ किलो या प्रमाणात नोंद करावी लागणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इयत्ता / खर्च दर / विद्यार्थ्यांचा आहार 
-1ली ते पाचवी / 238/ 6 किलो 
-सहावी ते आठवी / 402/ 9 किलो

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा