

Party Workers Hope for Renewed Power as Sunetra Pawar Takes Charge as Deputy CM
Sakal
पिंपरी : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या धक्क्यातून सावरत पक्षाला उभारी देण्याचे नवे आव्हान शहर राष्ट्रवादी काँग्रेससमोर उभे राहिले आहे. पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सध्या राज्यातील नेतृत्वाच्या भूमिकेकडे आशेने पाहत आहेत. उपमुख्यमंत्रिपदी सुनेत्रा पवार यांना जबाबदारी मिळाल्यानंतर जिल्ह्याच्या पालकत्वाची धुरा शहराकडे वळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पिंपरी चिंचवड हा दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला मानला जात होता. मध्यंतरीच्या काळात अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते पक्ष सोडून गेले असले, तरी अजित पवार यांना मानणारा मोठा वर्ग आजही शहरात सक्रिय आहे.