अपघातग्रस्तांची मदत करणाऱ्या कार्यकर्तींचं सुप्रिया सुळेंकडून कौतुक 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 31 August 2020

अपघातग्रस्त ट्रेलरचालकास मदत करत राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वस्तूपाठ घालून दिला.

लोणावळा (पुणे) : अपघातग्रस्तांना मदत केली पाहीजे, असे आपण नेहमी म्हणतो. मात्र, प्रत्यक्षात कधी कधी टाळण्याचा प्रयत्नही करतो. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटात सोमवारी (ता. 31) सकाळी अपघातग्रस्त ट्रेलरचालकास मदत करत राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वस्तूपाठ घालून दिला.

#JusticeForKaku : दीड हजार अन् तीनशे दिले, अठराशे नाही दिले, तुम्हाला तरी जमतोय का हिशोब ? (व्हिडिओ)
 
राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या डॉ. अमृता मेणकुदळे, श्रीया भोसले, आरती हुळे, कीर्ती मोरे यांनी गाडी थांबवून अपघातग्रस्त चालकास केलेल्या मदतीची खासदार सुप्रिया सुळे यांनी दखल घेत ट्विटरवर त्यांचे कौतुक केले. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मुंबईकडे जाताना बोरघाटातील नवीन अमृतांजन पुलाजवळ ट्रेलरचालकाचे भरधाव वेगामुळे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रेलर रस्त्याच्या संरक्षक कठड्यास धडकला. यावेळी द्रुतगतीवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. 

लोणावळ्यात वाढत्या कोरोनाबाधितांमुळे भाजपने प्रशासनास धरले धारेवर

अपघातात चालकास किरकोळ दुखापत झाली. याचदरम्यान राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या कार्यकर्त्या डॉ. अमृता मेणकुदळे या आपल्या सहकाऱ्यांसह मुंबईच्या दिशेने निघाले होते. अपघातग्रस्त चालकाच्या मदतीस कोणी पुढे येत नसताना त्यांनी पुढे सरसावत कंटेनर चालकास तातडीचे प्रथमोचार करत मदत केली. त्यांच्या कार्यांने प्रभावित होत खासदार सुळे यांनी त्यांचे कौतुक केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: supriya sule appreciates the ncp activists who helped the accidents victims