
गेल्या काही दिवसांपासून मोटारचालकांना मास्कच्या दंडासाठी "टार्गेट' केले जात आहे. चारही काचा बंद असूनही दंड आकारला जात आहे. काही जण श्वसनास अडथळा निर्माण होत असल्याने मास्क लावत नाहीत. परिणामी, सोशल डिस्टन्सिंग असूनही किरकोळ कारणावरून दंड आकारण्याचे प्रकार शहरात घडत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
पिंपरी - गेल्या काही दिवसांपासून मोटारचालकांना मास्कच्या दंडासाठी "टार्गेट' केले जात आहे. चारही काचा बंद असूनही दंड आकारला जात आहे. काही जण श्वसनास अडथळा निर्माण होत असल्याने मास्क लावत नाहीत. परिणामी, सोशल डिस्टन्सिंग असूनही किरकोळ कारणावरून दंड आकारण्याचे प्रकार शहरात घडत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
प्रसंग 1
28 नोव्हेंबरला निगडी प्राधिकरण येथील रहिवासी सुनीता कुलकर्णी या निगडीहून चिंचवडकडे जात असताना सिग्नलला पोलिसांनी गाडी अडवली. कुलकर्णी यांनी चेहऱ्यावरचा मास्क घाम पुसण्यासाठी खाली घेतला. सुनीता म्हणाल्या, 'पती डॉक्टर असल्याने मला नियम व संसर्गाची तीव्रता माहीत आहे. मी केवळ घाम पुसण्यासाठी मास्क खाली घेतला. तेवढ्यात तुम्ही दंड आकारला हे चुकीचे आहे.'' मात्र, पोलिसांनी काहीही ऐकून न घेता 500 रुपये दंड पावती केली. नाहक चालकांकडून दंड आकारत असल्याचे त्यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.
पिंपरी-चिंचवड शहरात दोन जणांचा मृत्यू; तर 172 नवीन रुग्ण
प्रसंग 2
ता. 21 नोव्हेंबरला कडोलकर कॉलनी, तळेगाव येथील माधव खरे हे स्वतः:च्या मोटारीमधून पुण्याला जात होते. मास्क नाकाच्या खाली आल्याने दंड आकारण्यात आला. मोटारीतून प्रवास करीत असताना गुदमरल्यासारखे होत असल्याने मास्क खाली केला होता. त्यांनी पोलिसांना वाहनांमध्ये मास्क घालणे गरजेचे आहे का? अशी विचारणा केली. मात्र, पोलिसांनी नेहमीप्रमाणे "आम्हाला काहीही माहिती नाही, दंड भरा' असे उत्तर दिले. सामान्य जनतेची लूट थांबविण्यात यावी,' यासाठी खरे यांनी "सकाळ'कडे दाद मागितली.
विधान परिषद मतदानासाठी पिंपरी-चिंचवड शहरात पदवीधरांसाठी 43, शिक्षकांसाठी 9 मतदान केंद्र
या आहेत अडचणी
- मोटारीत श्वसनाचा त्रास
- सर्दीच्या त्रासामुळे श्वसनास अडथळा
- मोटारीतील वातानुकूलित यंत्रणा बंद
- झोपेत असतानाही मास्क घालणे चुकीचे
- लहान मुले ऐकत नाहीत
Edited By - Prashant Patil