दोन तरुणांमधील भांडणातून चिंचवडमध्ये दहा वाहनांची जळपोळ

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 January 2021

दोन तरुणांनी मिळून एक कॅमेरा घेतला होता. मात्र, एक तरुण त्यातील कॅमेराचे हप्ते देत नसल्याने दुसऱ्या तरूणाने कॅमेरा स्वतःकडे ठेवून घेतला. यामुळे त्या दोघामध्ये भांडण झाले. दरम्यान, त्यातील एका तरुणाने दुसऱ्या तरुणाची दुचाकी जाळली. मात्र, पेटवलेल्या या दुचाकीमुळे इतर दहा गाड्यानीही  पेट घेतला.

पिंपरी : दोन तरुणांमध्ये झालेल्या भांडणातून एका तरुणाने दुसऱ्या तरुणाची दुचाकी जाळली. यामुळे सोसायटीतील इतर दहा वाहनेही जळाली. ही घटना चिंचवडमधील काकडे टाऊनशिप येथे बुधवारी (ता. 13) पहाटे घडली.

दोन तरुणांनी मिळून एक कॅमेरा घेतला होता. मात्र, एक तरुण त्यातील कॅमेराचे हप्ते देत नसल्याने दुसऱ्या तरूणाने कॅमेरा स्वतःकडे ठेवून घेतला. यामुळे त्या दोघामध्ये भांडण झाले. दरम्यान, त्यातील एका तरुणाने दुसऱ्या तरुणाची दुचाकी जाळली. मात्र, पेटवलेल्या या दुचाकीमुळे इतर दहा गाड्यानीही  पेट घेतला.

ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी नियमावली जाहीर; विमानसेवा सुरु

पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. अचानक आग लागल्यामुळे व मोठ्या प्रमाणात धूर पसरल्याने रहिवंशामध्ये भितीचे वातावरण पसरले. काही नागरिकांनी अग्निशामकशी संपर्क केल्यावर अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. दहा गाड्या जळून खाक झाल्या होत्या.

ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून हा प्रकार उघडकीस आला. चिंचवड पोलिस अधिक तपास करीत आहेत.
 
सीरमनंतर स्वदेशी भारत बायोटेकच्या लशीलाही मंजुरी मिळण्याची शक्यता; बैठक सुरु

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ten vehicles vandalisation in Chinchwad due to quarrel between two youths