पिंपरी चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या रावेत बंधऱ्यात हजारो मासे मृत अवस्थेत

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 November 2020

बुधवारी (ता.4) सकाळी रावेत बंधारा येथे भोंडवे लॉन्स जवळ मासे मृत अवस्थेत सापडल्याची माहिती तेथील नागरिकांनी महापौरांना फोन करुन दिली. महापौरांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी हजारो लहान मोठे मासे मृत अवस्थेत आढळले.

पिंपरी :  पिंपरी चिंचवडच्या रावेत बंधारा येथून पाण्याचा उपसा केला जातो. हे पाणी शुद्ध करुन पिंपरी चिंचवड शहराच्या नागरिकांना पुरवले जाते. मात्र या बंधाऱ्यात शहरातील कंपन्यांचे अशुद्घ सांडपाणी सोडले जात आहे. यामुळे हजारो मासे मृत झाल्याची माहिती  समोर येत आहे. याबाबत महापौर उषा ढोरे यांना माहिती  मिळताच त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी महापौर ढोरे यांनी आयुक्त श्रावण हर्डिकर यांना केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बुधवारी (ता.4) सकाळी रावेत बंधारा येथे भोंडवे लॉन्स जवळ मासे मृत अवस्थेत सापडल्याची माहिती तेथील नागरिकांनी महापौरांना फोन करुन दिली. महापौरांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी हजारो लहान मोठे मासे मृत अवस्थेत आढळले. कंपन्यांचे अशुद्ध पाणी नदीत कोणतीही प्रक्रिया केल्याशिवाय सोडले जात असल्याचे पाहणीत समोर आले.  या संबंधित कंपन्यांमुळे नदीचे प्रदूषण होत आहे. तसेच हे पाणी नागरिकांच्या जीविताला धोकादायक आहे. त्यामुळे त्वरीत या कंपन्यांवर कडक कारवाई करण्याची गरज असल्याचे महापौरांनी म्हटले.

सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना नोंदणीसाठी सरकारकडून मुदतवाढ
 

रावेत बंधारा येथून उपसा केलेले पाणी प्रक्रिया करुन नागरिकांना पिण्यासाठी वापरले जाते. मात्र या अशुद्ध पाण्यामुळे नदीतील जलचरांच्या जीवाला हानी होत आहे. त्यामुळे पर्यायाने नागरिकांना हा धोका मोठा आहे. यावेळी माजी नगरसेवक गणेश भोंडवे, जवाहर ढोरे आदी उपस्थित होते.

पुणे : दापोडे गोळीबार प्रकरणातील दोन आरोपी अटक 
 

Edited By : sharayu Kakade


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thousands of fish found dead near Ravet dam