
राज्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना ता. 31 मार्च 2020 रोजी शेवटची मुदत असलेली नवीन नोंदणी व नूतनीकरणासाठीची मुदत (ता. 31 मार्च 2021 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.
मंचर : राज्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना ता. 31 मार्च 2020 रोजी शेवटची मुदत असलेली नवीन नोंदणी, व नूतनीकरणासाठीची मुदत (ता. 31 मार्च 2021 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. या निर्णयाचा फायदा हजारो अभियंत्यांना होणार आहे. शासकीय जीआर शासनाने काढलेला आहे. या निर्णयाचा फायदा वीस ते पंचवीस हजार अभियंत्यांना होणार आहे, अशी माहिती राज्य स्थापत्य अभियंता संघटनेचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष दिलीप मेदगे यांनी दिली.
हेही वाचा : पीएमपीच्या ६० टक्के बस मार्गांवर; रोजचे एवढे प्रवासी करतात प्रवास
ते म्हणले, ''कोरोनाच्या काळामध्ये मार्चमध्येच लॉकडाउन सुरू झाल्यामुळे शेवटच्या क्षणी अनेक अभियंते नोंदणीपासून वंचित राहिले होते. अनेकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे राज्याचे सचिव यांच्याकडे यापूर्वीच पत्रव्यवहार केला होता. त्यावेळी ही मुदत किमान ३१ जुलै पर्यंत वाढून देण्यात यावी. अशी विनंती राज्य स्थापत्य अभियंता संघटनेचे महासचिव महावीर पाटील व मी सचिवांना केली होती. परंतु त्यानंतर पुन्हा एकदा अभ्यास समितीच्या बैठकीमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दोन्ही सचिव व सार्वजनिक बांधकाम खात्याचे पुण्याचे मुख्य अभियंता सदाशिव साळुंखे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली.
हेही वाचा : पुण्यात उद्योगचक्राला गती; उत्पादनक्षमता आता ७२ टक्के
शासकीय जीआर कमिटी अभ्यास समितिचा सदस्य म्हणून मी हजार होतो. मुदत ता.३१ मार्च २०२१ पर्यंत वाढवावी. अशी विनंती केली होती. सचिव देबडवार यांनी मुदतवाढ देण्याचे सरकारने मान्य केले आहे. असे आश्वासित केले होते. व त्याबाबत शासकीय आदेश प्राप्त झाला आहे. यापुढे शासन अशी मुदतवाढ देणार नाही. सर्व अभियंत्यांनी ता.३१ मार्च २०२१ च्या पूर्वी नोंदणी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी करून घ्यावी. देबडवार साळुंके ,उपसचिव . राजेंद्र जवंजाळ , सचिन चिवटे ,जीआर अभ्यास समितीचे सदस्य किरण ढोकणे यांची याकामी मदत मिळाली”.