esakal | पुणे : दापोडे गोळीबार प्रकरणातील दोन आरोपी अटक
sakal

बोलून बातमी शोधा

Criminal-Arrested

वेल्हे तालुक्यातील दापोडे येथील हॉटेल चालक गोळीबार प्रकरणातील दोन आरोपींना सापळा रचून जेरबंद करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण पुणे ग्रामीण पोलीसांनी दिली. पोलीसांनी दिलेल्या माहीती नुसार वेल्हे तालुक्यातील दापोडे येथे दि. १ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता हॅाटेलचालक विलास नथु बोरगे यांच्यावर अज्ञात तीन इसमांनी गोळीबार केला होता त्यात बोरगे गंभीर जखमी झाले आहेत.

पुणे : दापोडे गोळीबार प्रकरणातील दोन आरोपी अटक

sakal_logo
By
मनोज कुंभार

वेल्हे (पुणे) - वेल्हे तालुक्यातील दापोडे येथील हॉटेल चालक गोळीबार प्रकरणातील दोन आरोपींना सापळा रचून जेरबंद करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण पुणे ग्रामीण पोलीसांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलीसांनी दिलेल्या माहीती नुसार वेल्हे तालुक्यातील दापोडे येथे दि. १ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता हॅाटेलचालक विलास नथु बोरगे यांच्यावर अज्ञात तीन इसमांनी गोळीबार केला होता त्यात बोरगे गंभीर जखमी झाले आहेत. गोळीबार केल्यानंतर आरोपींनी करंजावणे मार्गे कुसगाव खिंडीतुन पलायन केले होते. वेल्हे पोलीस व पुणे ग्रामीण पोलीस, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस आरोपींच्या मागावर होते.

डिझेल ओव्हर फ्लो झाले पण, अधिकाऱ्यांनी पाहिले नाही

आज दि. ४ नोव्हेंबर रोजी पोलीसांनी यातील दोन आरोपींना आज जेरबंद केले आहे. आरोपींनी गोळीबार करताना वापरलेली MH-12-QV7104 गाडीमालक दत्तात्रय बाळासाहेब पवार यांचा मुलगा सुजित दत्तात्रय पवार हा वापरत होता. सुजीतकडे चौकशी केली असता ही गाडी तिघांनी नेली असल्याची माहीती मिळताच त्यातील दोघे जण भोर तालुक्यातील कुसगाव येथे गेले असल्याची माहीती पोलीसांना खबऱ्याकडून मिळाली त्यानुसार पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॅा. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक विवेक पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक पद्याकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, अमोल गोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप जाधवर, चंद्रकांत झेंडे सचिन गायकवाड, प्रमोद नवले, पोलीस कॉन्स्टेबल अमोल शेडगे, मंगेश भगत अक्षय नवले, प्रसन्न घाडगे, आदींनी कारवाई केली.

सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना नोंदणीसाठी सरकारकडून मुदतवाढ

पोलीसांनी १) संदीप उर्फ सॅंडी सिद्धेश्वर धुमाळ (वय २०) रा.खोली नं 511 साई अपार्टमेंट, हनुमान नगर, जांभुळवाडी रोड, आंबेगाव खुर्द, पुणे - २) रुपेश उर्फ भैय्या श्रावण पालखे (वय २०) राहणार लेन नं ६, टेल्को कॅालनी, दत्तनगर, पोलीस चौकीशेजारी, जांभुळवाडी रोड, पुणे. यांना अटक केली आहे. आरोपींनी त्यांच्या जवळ असलेल्या गावठी पिस्टल मधून 3 राऊंड फायर करून हॉटेल चालकास गंभीर जखमी केले होते. त्यांच्याकडे केलेल्या प्राथमिक तपासणीत त्यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले असून अधिक तपासणीसाठी आरोपींना वेल्हे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

Edited By - Prashant Patil

loading image
go to top