Fraud
FraudSakal

बनावट कागदपत्रे तयार करून पिंपळे सौदागरमध्ये फसवणूक

खोटी सही करून फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

पिंपरी : बनावट कागदपत्रे तयार करीत त्यावर खोटी सही करून फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार पिंपळे सौदागर येथे घडला. या प्रकरणी दिलीप बापूसाहेब गायकवाड (रा. मिरानगर, कोरेगाव पार्क, पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार निकिता अरुण उत्तरकर, अरुण रामचंद्र उत्तरकर (दोघेही रा. एम. जी. रोड खडकी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांचा पिंपळे सौदागर येथील फ्लॅट खरेदी करण्यासाठी आरोपींनी फिर्यादी यांना काही रक्कम दिली. उर्वरित रक्कम काही दिवसांत देतो, असे सांगून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. आरोपींनी फ्लॅटचा ताबा घेऊन त्यामध्ये भाडेकरू ठेवला. येथील वीजमीटर फिर्यादी यांच्या नावावर असताना आरोपींनी तो मीटर स्वतःच्या नावावर करण्याचा उद्योग केला. फिर्यादी व सोसायटीची एनओसी न घेता वीजमीटर नावावर करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांवर आरोपींनी फिर्यादी यांची खोटी सही केली. बनावट कागदपत्रे तयार करून ती कागदपत्रे एमईसीबीच्या कार्यालयात सादर करून वीजमीटर आपले नावावर केला. तसेच फ्लॅटची उर्वरित रक्कम फिर्यादी यांना न देता त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.(Fraud in Pimple Saudagar by fake documents)

Fraud
कोरोना होम टेस्टमध्ये 3549 पॉझिटिव्ह - किशोरी पेडणेकर

भोसरीत घरफोडी; अडीच लाख लंपास
दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात शिरलेल्या चोरट्याने अडीच लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना भोसरीतील इंद्रायणीनगर येथे घडली. याप्रकरणी बाळू पिलाजी लांडे (रा. सेक्टर क्रमांक एक, इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरटे दरवाजाचा कडीकोयंडा तोडून फिर्यादीच्या घरात शिरले. सोन्याचे कानातील टॉप्स, सोनसाखळी, सत्तर हजारांची रोकड, पाच हजारांचा सीसीटीव्हीचा डीव्हीआर व वायफाय राउटर असा एकूण दोन लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. दरम्यान, हे चोरटे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Fraud
आरटीई २५ टक्के प्रवेशात आता राष्ट्रीयकृत बॅंकेचेच खातेपुस्तक ग्राह्य

चिंचवडमध्ये एकावर चोरीप्रकरणी गुन्हा
घराचे कुलूप तोडून घरातील साहित्य चोरून नेल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार चिंचवड येथे घडला. या प्रकरणी एका महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन जगदाळे (रा. ओमसाई कॉलनी, चिंचवडेनगर, चिंचवड) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी या घरात नसताना बंद घराचे कुलूप तोडून सचिन घरात शिरला. घरातील ७० हजार ५०० रुपये किमतीचे संसारोपयोगी साहित्य चोरून नेले. चिंचवड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Fraud
पुण्यात आणखी एका MPSC उमेदवाराची आत्महत्या

निगडीत तिघांना मारहाण
किरकोळ कारणावरून तिघांना शिवीगाळ करीत मारहाण करण्यात आली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार निगडी येथे घडली. याप्रकरणी भैरू शरणप्पा बहीरजे (रा. महात्मा फुले हौसिंग सोसायटी, ओटास्कीम, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन गुलाब जाधव व रितेश पोपट सोनवणे (दोघेही रा. ओटास्कीम, निगडी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे शुक्रवारी (ता. १४) सायंकाळी साडे चारच्या सुमारास त्यांची रिक्षा घेऊन कामासाठी जात होते. दरम्यान, आरोपी सोनवणे तेथे आला. त्यावेळी फिर्यादीने आरोपीस येथे काय करतो असे विचारले असता याचा राग आल्याने आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ केली. रिक्षातील गिअर वायर काढून मारहाण करीत फिर्यादीला जखमी केले. त्यानंतर फिर्यादीच्या आई व पत्नीलाही शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून अधिक तपास सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com