
भोसरी, ता. २२ ः संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय योग दिवस ‘एक पृथ्वी, एक स्वास्थ्य करिता योग’ असा जाहीर केला आहे. भोसरी परिसरात विविध सामाजिक संस्था, शाळा यांच्याद्वारे आंतरराष्ट्रीय योग दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
संत निरंकारी मिशन
भोसरीतील दिघी रस्त्यावरील संत निरंकारी सत्संग भवनात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात दोनशेहून अधिक अनुयायांनी योगासने केली. सदगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने हा योग दिन साजरा करण्यात आला.
न्यू इंग्लिश स्कूल
दिघी रस्त्यावरील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शाळेचे मुख्याध्यापक, सहायक विभागीय अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली योग दिन साजरा करण्यात आला. प्रियांका बागल यांनी योगा प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी दत्तात्रय शिंदे, अभय धराडे, सुषमा गांजुरे, मोनिका घुले आदींसह विद्यार्थी पालक उपस्थित होते. विद्यार्थ्यांसाठी योग गीत, घोषवाक्ये व योगासन स्पर्धेचे आयोजन झाले.
राजमाता जिजाऊ प्रसारक मंडळ
उच्च व तंत्र शिक्षण विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि भोसरीतील राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन माउलीच्या पालखी सोहळ्यातील चातुर्मुख महादेव संस्थान (दिंडी क्रमांक ३०२) च्या वारकऱ्यांसमवेत साजरा केला. या उपक्रमात २७० वारकऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी प्राचार्य डॉ. के. जी. कानडे यांनी मार्गदर्शन केले. डॉ. गणेश चव्हाण यांनी प्रात्यक्षिकांमधून भक्ती व योग यांचा संगम साधला. संस्थेचे अध्यक्ष, माजी आमदार विलास लांडे यांनी शुभेच्छा दिल्या. डॉ. सुग्रीव आडाल, प्रा. अनिल गंभीरे, प्रा. माधुरी चौधरी, प्रा. पूनम पाटील, आकाश साळी यांनी संयोजन केले.
BHS25B03045
मोशीत योग प्रात्यक्षिके
मोशी : दक्षिणेश्वर हनुमान मंदिराच्या प्रांगणात जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव दंडवते होते. योग शिक्षक सौरभ कुमार, सुकन्या गायकवाड, काजल गडाख यांनी योग प्रात्यक्षिक करुन घेतले.
विलास गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शीतल नलावडे, माधुरी सुरडकर, हेमा पटाटे यांनी प्रयत्न केले. मयुरी हाडवळे यांनी आभार मानले.
भैरवनाथ माध्यमिक विद्यालय
मोशी : भोसरीतील श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे योग प्रात्यक्षिके आणि विद्यार्थ्यांचा निरोगी आहार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी योगाचार्य डॉ.नारायण वाघुले यांचे योगासने आणि विद्यार्थ्यांचा आहार या विषयावर प्रात्यक्षिक व्याख्यान आयोजित करण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य नवीनकुमार आहेर, उपप्राचार्य संजीव राणे, उपमुख्याध्यापक दीपक बागुल, पर्यवेक्षक प्रमोद थोरात, पर्यवेक्षिका सुनंदा जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी विद्यालयातील एक हजार विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कारासह विविध योगासनांची प्रात्यक्षिके केली. संस्थेचे अध्यक्ष श्रीप्रकाश बोरा, उपाध्यक्ष ॲड. जितेंद्र बोरा यांनी शुभेच्छा दिल्या.
MOS25B03699
महात्मा फुले अपंग प्रशिक्षण केंद्र
हिंजवडी : आयटी पार्क माण येथील महात्मा फुले अपंग प्रशिक्षण केंद्र संस्थेत सर्व दिव्यांग विद्यार्थी त्यांचे शिक्षक व कर्मचाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला. सहभागी झालेल्या सर्वांना संस्थेने ई- प्रमाणपत्र प्रदान केले.
संचेती हॉस्पिटल फिजिओ थेरपी कॉलेज, शिवाजीनगर इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी, योग प्रशिक्षक आणि फिजिओ थेरपिस्ट मधुरा कुलकर्णी, अल्फीया पठाण, ध्रुविका पाचीसिया यांनी योगाचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. श्रुरुश्री मित्रा यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व
विद्यार्थी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी योगाची प्रात्यक्षिके सादर केली. मुख्याध्यापक गणेश जगताप यांनी आभार मानले.
WKD25A08907
अभिराज फाउंडेशन
वाकड : येथील अभिराज फाउंडेशन या स्वमग्न, बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांच्या शाळेमधील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने विविध प्रकारची योगासने केली. सर्व महिला शिक्षकांनी योगासनाचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवले. योगासनांचे फायदे विद्यार्थ्यांना व पालकांना सांगण्यात आले. मुख्याध्यापिका अनिता चव्हाण व सर्व शिक्षक वर्ग यांनी मेहनत घेतली. संचालक रमेश मुसूडगे, स्वाती तांबे यांनी शुभेच्छा दिल्या.
इंडस
वाकड : इंडसमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय योगा दिनात सर्व शिक्षक, शिक्षिकेतर कर्मचारी आणि सुमारे पाचशे विद्यार्थी सहभागी झाले. आयआयईबीएमचे अध्यक्ष कर्नल विनोद मारवाह, व्यवस्थापकीय संचालक डॉ. जयसिंग मारवाह, अधिष्ठाता डॉ. पूनम निकम, कर्नल रवींद्र कुमार, डॉ.विशाल भोळे, जे.पी.वर्मा, ग्रंथपाल बापू पवार आदी उपस्थित होते.
लोकमान्य टिळक विद्यालय
वाकड : थेरगाव येथील लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालयात सुनिता घोडे, अंजली सुमंत यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाची माहिती दिली. संस्थेचे कार्यवाह ॲड. सतीश गोरडे, उपाध्यक्ष डॉ. अशोक नगरकर, राजेंद्र केंडे उपस्थित होते. योगेश्वरी महाजन यांनी योगासन प्रात्यक्षिके सादर केली. नंतर पद्मासनामध्ये बसून कपाळभाती, अनुलोम-विलोम, भ्रामरी घेण्यात आले. मुख्याध्यापिका अश्विनी बाविस्कर, सारिका देसाई, कौशल्या गायकवाड, शाम मस्तूद या सर्व शिक्षकांनी संयोजन केले. दिप्ती बंदपट्टे यांनी सूत्रसंचालन केले. अश्विनी दळवी यांनी आभार मानले.
खिंवसरा पाटील विद्या मंदिर
वाकड : क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित खिंवसरा पाटील विद्या मंदिरात योगशिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना योग दिनाचे महत्त्व सांगितले. भारतीय योग संस्थेच्या तुलसी नायडू व सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना योगासने प्राणायामांची प्रात्यक्षिके दाखविली. क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे उपाध्यक्ष अशोक नगरकर, सदस्य आसाराम कसबे, दिनेश जगताप उपस्थित होते. प्रज्ञा फुलपगार यांनी पाहुण्यांचा परिचय दिला. प्रभारी मुख्याध्यापिका मंजुषा गोडसे यांनी आयोजन केले. सीमा आखाडे यांनी प्रास्ताविक केले. कृतिका काळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रमोदिनी बकरे यांनी आभार मानले.
श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान
जाधववाडी ः राजे संभाजीनगर येथे श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान आणि लोटस फिटनेस यांच्या संयोजनाने योग वर्गाचे आयोजन करण्यात आले. गिर्यारोहक विश्वास सोहनी, स्वामी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण बहिरवाडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष हरी नारायण शेळके आणि स्वामी मंदिराच्या सेवेकरी क्षमा काळे यांनी उद्घाटन केले. यावेळी उपाध्यक्ष राजू गुणवंत यांनी योगाचे महत्व विशद केले. योग शिक्षिका रेशमा यांनी विविध योगासनाचे प्रकारांबद्दल माहिती दिली आणि योग करून दाखवले.
बाबुरावजी घोलप महाविद्यालय
पिंपळे गुरव ः पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे नवी सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये योग व ध्वनी उपचार पद्धतीच्या प्रसिद्ध संशोधक अभ्यास मेघा मोहिते यांच्या विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले.
यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्या व महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा.डॉ. संगीता जगताप, प्रा. विजय घारे, प्रा. डॉ. अर्जुन डोके, डॉ. विद्या पाठारे, अनुरीता गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.