pune crime
pune crime esakal

Chinchwad Police: चिंचवडमध्ये पोलिसच सुरक्षित नाहीत? पोलिसांवरील हल्ल्यांमध्ये होतेय वाढ

पिंपरी: नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलिसांवरच हल्ले होत आहेत. धक्काबुकी, मारहाण, मोटार अंगावर घालून जिवे मारण्यापर्यंत काहींची मजली गेली आहे. एका महिन्यात अशा तब्बल चार घटनांची नोंद झाली आहे.

कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासह नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिस सतत कार्यरत असतात. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाते. दरम्यान, कर्तव्य बजावत असताना काही प्रकरणात पोलिसांच्याच जिवाला धोका निर्माण होतो. आरोपीला ताब्यात घेत असताना, बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करताना पोलिसांशी हुज्जत घालण्याचे प्रकार वाढत आहेत. शिवीगाळ, मारहाण प्राणघातक हल्ल्याचेही प्रकार घडले आहेत. २०२२ या वर्षांत एकूण ५२ घटना घडल्या, तर या वर्षी आठ घटनांची नोंद झाली आहे.

pune crime
Sharad Pawar Resigns : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी जनतेची पसंती कोणाला? सुप्रिया सुळे, अजित पवार की…

नियमांचे उल्लंघन करून अरेरावी
रस्त्याने जात असताना वाहतूक नियमांचे उल्लंघन करायचे. वाहतूक पोलिस नियमानुसार कारवाई करण्यास गेल्यानंतर कुणाची तरी ओळख सांगायची, मी अमुक व्यक्तीचा नातेवाईक आहे, तुमच्याकडे बघून घेतो, वर्दी उतरवतो, अशी धमकी देण्याचे प्रकार घडतात. काहीजण एवढ्यावर न थांबता हात उचलण्यापर्यंतचे पाऊल टाकतात.
-----------------------------
आम्ही नागरिकांच्या सुरक्षेसाठीच कार्यरत असतो. सर्वांनी कायद्याचे पालन करायलाच हवे. एकाला एक नियम व दुसऱ्याला दुसरा नियम असे होत नाही. हे प्रत्येकाने समजायला हवे. कायदा, नियम सर्वांना सारखाच असतो.
- सचिन गायकवाड, पोलिस अंमलदार.

pune crime
Sharad Pawar Resigns: राष्ट्रवादी अध्यक्षपदासाठी पवारांच्या सख्ख्या बहिणीनं सुचवलं बड्या नेत्याचं नाव

टाटा टी जंक्शन येथे वाहतूक नियमन करीत असताना विरुद्ध दिशेने जाणारा मोठा ट्रक जात होता. तो ट्रक थांबवला. यावरून ट्रक का थांबवला, आम्ही गाववाले आहोत, असे म्हणत धमकी देत मारहाण केली. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात आली. कायदा सर्वांना सारखाच असतो. कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई होणारच.

- सोमनाथ दिवटे, पोलिस अंमलदार.

चालू महिन्यातील घटना

२ एप्रिल
फुगेवाडी येथे महिला वाहतूक पोलिसाची कॉलर पकडून शिवीगाळ करीत मारहाण.

३ एप्रिल
चांदखेड येथील चंदनवाडी येथे पोलिसाची गचांडी पकडून शिवीगाळ

४ एप्रिल
चिंचवड येथे वाहतूक पोलिसांच्या अंगावर गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न. बॉनेटवर घेऊन मोटार भरधाव चालवली.

२६ एप्रिल
बावधन पोलिस चौकीत पोलिस कर्मचाऱ्याच्या शर्टची कॉलर पकडून धमकी व शिवीगाळ.

२०२२ मधील हल्ल्याच्या घटना
जानेवारी ५
फेब्रुवारी ३
मार्च ४
एप्रिल ३
मे ५
जून ३
जुलै २
ऑगस्ट ३
सप्टेंबर ७
ऑक्टोबर ७
नोव्हेंबर ६
डिसेंबर ५
२०२३
जानेवारी २
फेब्रुवारी १
मार्च १
एप्रिल ४

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com