esakal | 'टुर्स अँड ट्रॅव्हल्स'चे ग्रहण सुटेना 
sakal

बोलून बातमी शोधा

Travels

गेली 25 वर्षे आराम बस प्रवासी वाहतूक व्यवसायात आहे. मात्र, कोरोनाचे मोठे संकट कोसळले की, वातानुकुलीत पंधरापैकी तब्बल दहा बस गेल्या सात महिन्यांपासून जागेवरच थांबून आहेत. त्यांना गंज चढण्याची वेळी आहे. उर्वरित पाच बसच्या कशाबशा सुरू असलेल्या फेऱ्यांवर व्यवसाय सुरू आहे, अशी व्यथा चॉईस टुर्स अँड ट्रॅव्हल्सचे व्यवस्थापक सागर बोराडे यांची आहे. हीच परिस्थिती शहरातील सर्वच ट्रॅव्हल्स व्यावसायिकांवर ओढवली आहे.

'टुर्स अँड ट्रॅव्हल्स'चे ग्रहण सुटेना 

sakal_logo
By
सुवर्णा नवले

लॉकडाउनपासून व्यवसायाला लागलेली खीळ अद्याप कायम; सणांमध्येही प्रतिसाद नाही 
पिंपरी - गेली 25 वर्षे आराम बस प्रवासी वाहतूक व्यवसायात आहे. मात्र, कोरोनाचे मोठे संकट कोसळले की, वातानुकुलीत पंधरापैकी तब्बल दहा बस गेल्या सात महिन्यांपासून जागेवरच थांबून आहेत. त्यांना गंज चढण्याची वेळी आहे. उर्वरित पाच बसच्या कशाबशा सुरू असलेल्या फेऱ्यांवर व्यवसाय सुरू आहे, अशी व्यथा चॉईस टुर्स अँड ट्रॅव्हल्सचे व्यवस्थापक सागर बोराडे यांची आहे. हीच परिस्थिती शहरातील सर्वच ट्रॅव्हल्स व्यावसायिकांवर ओढवली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाउनपासून खासगी बस चालकांच्या टुर्स अँड ट्रॅव्हल्स व्यवसायाला लागलेले ग्रहण अद्याप सुटलेले नाही. दरवर्षी दसऱ्यापासूनच गाड्यांचे बुकींग असते. यावर्षी अद्याप एकही बुकींग झालेले नाही. त्याचबरोबर नवरात्र व गणपती या सर्वात मोठ्या उत्सवातही गाड्या धावल्या नाहीत. वातानुकुलीत व निमवातानुकुलीत बसमध्ये नव्याने केलेली गुंतवणूकही बऱ्याच जणांची वाया गेली. फायनान्स कंपन्यानी बस थेट ओढून नेल्या. हप्ते भरण्यासाठी एकेका व्यावसायिकाला दिवसभरात 25 ते30 कॉल येतात. 

पिंपरी : फॅन्सी नंबर प्लेट बनवल्यास दुकानचालकांवर होणार कायदेशीर कारवाई

औद्योगिकनगरीत 25 ते 30 वर्षांपासून व्यवसाय करीत असलेल्या बस मालकांच्या व्यवसायाला खीळ बसली आहे. शहरातील अक्षरक्ष: 25 टक्के व्यावसायिकांना भाडे भरणे जड जात असल्याने त्यांनी कार्यालयाला टाळे ठोकले आहे. तर इतरांनी भाजी व्यवसाय, विविध एजंट व्यवसाय व कंपन्यामध्ये नोकऱ्या स्वीकारल्या आहेत. मात्र, उरलेल्या व्यावसायिकांना अद्यापही दिवाळीची आस लागली आहे. 

शहरात पावणे तीनशे खासगी ट्रॅव्हल्स व्यावसायिक आहेत. त्याच्यावर अवंलबून असलेले इतर जिल्ह्यातील चालक व एजंट यांचीही संख्याही मोठी आहे. चाकण, तळेगाव एमआयडीसीतील कंपन्याना कमी दरात बस चालविण्यासाठी दिल्या आहेत. मात्र, कंपन्यांकडूनही भाडे वेळेत मिळत नाही. पाच महिन्यांपासून गाड्या जागेवर उभ्या आहेत. त्या स्क्रॅप होऊ नयेत यासाठी बसमालक एकमेकांना फोन करून बुकींग पुरवीत आहे. त्यानंतर एका मार्गावरील एक गाडी भरत असल्याचे टुर्स अँड ट्रव्हल्स असोसिएशनचे सचिव चंद्रकांत दानवले यांनी सांगितले. 

पिंपरी-चिंचवडमधील बारा सराईत गुन्हेगार तडीपार

माझ्याकडे चार कामगार होते. मी एक स्विप्ट कमी किंमतीत विकली. तीन इतरांच्या बस माझ्याकडे आहेत. त्याचबरोबर तिकिट बुकींगचा व्यवसाय ठप्प आहे. पुणे, शिर्डी ते मुंबईसाठी गाड्या जात असत. मात्र, चालकाचा पगार ही निघत नाही अशी स्थिती आहे. हप्ते थकले आहेत. दुकानाचे भाडे भरण्याचीही पंचाईत आहे. 
- राम रावणे, खासगी बस व्यावसायिक, वल्लभनगर 

खासगी बसचे गणित कोलमडले 
- बसचा मेटेंनन्स महिन्याकाठी 10 ते 15 हजार 
- व्यवसायासाठी जाहिरातींचा खर्च 
- ऑनलाइन बुकींगचा खर्च 
- चालकांचा पगार व भत्ता 

पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड 

ऐन दिवाळीत चाळीस टक्‍के भाडे कपात 
प्रवासी नसल्याने सध्या बसच्या दरात चाळीस टक्‍क्‍यांपर्यंत कपात केली आहे. यापूर्वी दरवर्षी प्रवाशांची संख्या इतकी असायची की गाड्यांची संख्या कमी पडायची, असे व्यावसायिकांनी सांगितले. इतर जिल्ह्यांतून गाड्या मागवून घेतल्या जात असत. त्याचे कमिशन 15 ते 20 टक्के परजिल्ह्यातील व्यावसायिकांना दिले जात असे. 

दरामध्ये झालेली उच्चांकी कपात 
मार्ग यावर्षीचे दर मागील वर्षीचे दर 

जळगाव 500 1000ते 1300 
लातूर 500 1200 ते 1300 
विदर्भ 800 ते 1000 1500 ते 2000 
मराठवाडा 600 1500 ते 1800 
धुळे 500 1200 ते 1300 
सूरत 600 1500 ते 1600 
अहमदाबाद 800 1500 ते 1800 
गोवा 600 1700 ते 1800 
हैद्राबाद/ बैंगलोर 1000 ते 1200 2000 ते 2500

Edited By - Prashant Patil