Accident
Accidentsakal

Accident : भरधाव ट्रेलरची चाके निखळून बसला अपघात

तळेगाव-चाकण रस्त्यावरील बालाजी मार्बलसमोर चाकणहून मुंबईकडे भरधाव जाणा-या अज्ञात ट्रेलरची मागील दोन्ही चाके अचानक निखळली.

तळेगाव स्टेशन - तळेगाव -चाकण महामार्गावर सत्यकमल कॉलनीसमोर गुरुवारी (ता.०४) रात्री अकराच्या दरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव ट्रेलरची चाके निखळून बसला धडकल्याने चाकण एमईडीसीमधील कामगार वाहतुकीच्या बसला अपघात झाला. सुदैवाने बसमधील कामगार अगोदरच उतरलेले असलयाने विचित्रपणे झालेल्या या अपघातात बसचे नुकसान वगळता मोठा अनर्थ टळला.

तळेगाव-चाकण रस्त्यावरील बालाजी मार्बलसमोर चाकणहून मुंबईकडे भरधाव जाणा-या अज्ञात ट्रेलरची मागील दोन्ही चाके अचानक निखळली. निखळलेली चाके अतिवेगाने विरुद्ध दिशेने चाकणकडे जाणा-या एमएच १४ के क्यू ३२२३ या कामगार वाहतूक करणाऱ्या बसच्या चालकाच्या बाजूस जोरात धडकली. बसचालकाने प्रसंगावधान राखत बसवर नियंत्रण मिळवले.

नेमका शेवटचा थांबा असल्यामुळे सुदैवाने बसमध्ये कुणीही प्रवासी नव्हते. मागे, पुढे इतर वाहने नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अपघातामध्ये बसची काच फुटून दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले असून, चालक किरकोळ जखमी झाला. विशेष म्हणजे ट्रेलरची चाके निखळून पडली तरीही ट्रक चालकाला याबाबत काहीही कळाले नसल्याने तो न थांबता पुढे निघून गेला.

दरम्यान, बसचे मालक आणि घटनास्थळावरुन जात असलेल्या वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे स्वयंसेवक भास्कर माळी यांच्यासह इतर प्रत्यक्षदर्शीनी क्रेन बोलावून अपघातग्रस्त बस रस्त्यावरुन बाजूला केली. अपघातामुळे तळेगाव चाकण महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. तळेगाव वाहतूक विभागाकडून सदर अपघाताबाबत माहीती उपलब्ध होऊ शकली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com