जाहिरातींच्या फ्लेक्ससाठी पिंपरी-चिंचवडमध्ये वृक्षतोड; अंघोळीची गोळी संस्थेची आयुक्तांकडे तक्रार 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 6 October 2020

जाहिरात फलक दिसण्यासाठी वाकड, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, काळेवाडी फाटा, हिंजवडी आयटी पार्क परिसरातील झाडांची वारंवार छाटणी केली जात आहे.

पिंपरी : जाहिरात फलक दिसण्यासाठी वाकड, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, काळेवाडी फाटा, हिंजवडी आयटी पार्क परिसरातील झाडांची वारंवार छाटणी केली जात आहे. याविषयी वारंवार तक्रार करूनही कारवाई केली जात नसल्याचे गाऱ्हाणे अंघोळीची गोळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी महापौर उषा ढोरे व महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे मांडले आहे. 

पिंपरी-चिंचवडकरांनो, आजचा दिवस काढावा लागणार पाण्याविना; उद्याही पाण्याची शक्यता कमीच

कुत्र्यांचा कहर; हिंजवडीत एकाच वेळी सहा कुत्र्यांचा तरुणीवर हल्ला

इंडियन रोड कॉंग्रेसच्या जाहिरात नियमानुसार मोकळ्या जागेत जाहिरात फलक लावायला हवेत. महापालिकेच्या आकाश चिन्ह परवाना विभागाने त्याबाबत पाहणी करूनच परवानगी द्यायला हवी. मात्र, या नियमांसह झाडांची छाटणी व तोडणीकडे आकाश चिन्ह परवाना व उद्यान विभागाचेही सर्रासपणे दुर्लक्ष होत आहे. ही वृक्षतोड थांबविण्यासाठी कार्यवाही करून स्मार्ट सिटीच्या सौंदर्यात भर घालावी, असे पत्र महापौर व आयुक्तांना देण्यात आले आहे.

अंघोळीची गोळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत पिंपळे गुरव उड्डाणपूल, पिंपळे सौदागर शिवार गार्डन, जगताप डेअरी चौक, काळेवाडी फाटा, हिंजवडी आयटी पार्क टप्पा एक मधील पेट्रोल पंप, साईबाबा टीव्हीएस शॉप परिसरात झाडांची छाटणी करण्यात आली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tree felling in Pimpri-Chinchwad for advertising flex