महत्त्वाची बातमी : पिंपरी-चिंचवडकरांनो, मंगळवारी पाणीपुरवठा राहणार बंद!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 5 October 2020

रावेत अशुद्ध जलउपसा केंद्राच्या पंपगृहांमधील  22 केव्ही उच्चदाब वीज संच मांडणीचे व दुरुस्तीचे काम तातडीने करायचे आहे. त्यामुळे मंगळवारी (ता. 6) सकाळी 11 ते दुपारी 12.30 या कालावधीमध्ये अशुद्ध जलउपसा बंद राहणार आहे. परिणामी मंगळवारी दुपारी 12 पासून रात्रीपर्यंत या नियोजित वेळेतील पाणीपुरवठा संबंधित भागांमध्ये होणार नाही. तसेच बुधवारी सकाळचा संपूर्ण  शहराचा पाणीपुरवठा कमी दाबाने व विस्कळीत होणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता रामदास तांबे यांनी दिली.

पिंपरी - रावेत अशुद्ध जलउपसा केंद्राच्या पंपगृहांमधील  22 केव्ही उच्चदाब वीज संच मांडणीचे व दुरुस्तीचे काम तातडीने करायचे आहे. त्यामुळे मंगळवारी (ता. 6) सकाळी 11 ते दुपारी 12.30 या कालावधीमध्ये अशुद्ध जलउपसा बंद राहणार आहे. परिणामी मंगळवारी दुपारी 12 पासून रात्रीपर्यंत या नियोजित वेळेतील पाणीपुरवठा संबंधित भागांमध्ये होणार नाही. तसेच बुधवारी सकाळचा संपूर्ण  शहराचा पाणीपुरवठा कमी दाबाने व विस्कळीत होणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता रामदास तांबे यांनी दिली. नागरिकांनी याची नोंद घ्यावी व उपलब्ध पाणी जपून वापरून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना नदीवरील रावेत बंधारा येथून अशुद्ध जल उपसा केला जातो. त्यासाठी रावेत येथे पंप हाऊस उभारले आहे. त्यातून वीस पंपाद्वारे अशुद्ध पाणी उचलून पाईपद्वारे निगडी प्राधिकरण सेक्टर 22 मधील जलशुद्धीकरण केंद्रात नेले जाते. शुध्द केलेले पाणी वेगवेगळ्या भागातील टाक्यांमध्ये पोचवून त्याद्वारे शहरात वितरित केले जाते.

पिंपरी-चिंचवडमधील रुग्णवाहिकांचा शॉर्टकट ठरेल जीवघेणा

रावेत बंधारा येथून दररोज सरासरी 510 दशलक्ष लिटर अशुद्ध जल उपसा केला जातो. मात्र, समन्याय पद्धतीने सर्वांना समान पाणी मिळावे यासाठी, गेल्या 25 नोव्हेंबर पासून दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. शिवाय, मंगळवारी रावेत अशुद्ध जल उपसा केंद्रातील पंपगृहांमधील दुरुस्तीचे काम तातडीने करायचे आहे. त्यामुळे मंगळवारी दुपारनंतरचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. बुधवारी सकाळचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होऊ शकतो. 

पिंपरी-चिंचवड : सरकारी कार्यालयांत नागरिकांचं बेजबाबदार वागणं ठरणार धोकादायक

दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर पाणी पुरवठा पूर्ववत करण्याचा विभागाचा प्रयत्न राहील. तरी, नागरिकांनी याची नोंद  घेऊन उपलब्ध पाणी जपून वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tuesday pimpri chinchwad water supply close