धक्कादायक! मारायचे होते एकाला पण, संपविले दुसऱ्यालाच

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 August 2020

शंकर गोविंद सुतार (वय 23, रा विध्यानगर, चिंचवड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी (ता. 21) मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास शंकर सुतार हनुमान मंदिरासमोर असताना त्याठिकाणी आलेल्या आरोपींनी हत्याराने वार करीत त्यांच्या डोक्यात पाटा घातला. हल्ला केल्यानंतर आरोपी फरारी झाले. उपचारादरम्यान शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास सुतार यांचा मृत्यू झाला.

पिंपरी : जुन्या भांडणावरून तसेच खुन्नस दिल्याच्या कारणावरून एकाला मारायला आले. मात्र, त्यावेळी आडवा आलेल्या दुसऱ्याच तरुणावर टोळक्याने हत्याराने वार करीत डोक्यात दगडी पाटा घालून तरुणाला संपविले. ही घटना पिंपरी येथे उघडकीस आली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शंकर गोविंद सुतार (वय 23, रा विध्यानगर, चिंचवड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी (ता. 21) मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास शंकर सुतार हनुमान मंदिरासमोर असताना त्याठिकाणी आलेल्या आरोपींनी हत्याराने वार करीत त्यांच्या डोक्यात पाटा घातला. हल्ला केल्यानंतर आरोपी फरारी झाले. उपचारादरम्यान शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास सुतार यांचा मृत्यू झाला.

वरसगाव ओव्हरफ्लो; खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात विसर्ग वाढवला

आरोपींच्या  शोधासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली. दरम्यान, या गुन्ह्यातील आरोपी विनोद उर्फ पप्या राकेश पवार (वय 21), अजय उर्फ एबी गणेश भिसे वय 20, दोघेही रा. दत्तनगर,  बुद्धविहाराजवळ, चिंचवड) हे कोणाला तरी भेटण्यासाठी बौद्धनगर येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी दोघांना जेरबंद केले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी इतर सहा साथीदारांसह खून केल्याची कबुली दिली. मात्र, जुन्या भांडणावरून तसेच खुन्नस दिल्याच्या कारणावरून दुसऱ्या व्यक्तीला मारायचे होते. मात्र, शंकर सुतारमध्ये आल्याने त्यांनाच संपविल्याची धक्कादायक कबुली आरोपींनी दिली आहे. या घटनेनंतर आरोपी बाहेर राज्यात पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पिंपरी पोलिसांनी त्यांना जेरबंद केले. अधिक तपास सुरू आहे. 
 
केंद्र सरकारच्या धोरणावर अजित पवारांचा सावध पवित्रा; सरसकट वाहतुकीबाबत वेगळा निर्णय घेणार?​

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two arrested of a young man in pimpri