टेंपोच्या धडकेत दुचाकीवरील बहिणींचा मृत्यू; रावेतमधील घटना

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 September 2020

भरधाव टेंपोने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोन बहिणींचा मृत्यू झाला. ही घटना रावेत येथे घडली. 

पिंपरी : भरधाव टेंपोने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोन बहिणींचा मृत्यू झाला. ही घटना रावेत येथे घडली. 

शीतल अभिजीत गिरमे (वय 31, रा. भोंडवेनगर, रावेत) व सायली ज्ञानेश्‍वर हेगडे (वय 28, रा. सुदर्शननगर, नवी सांगवी) अशी या अपघातात मृत्यू झालेल्या बहिणींची नावे आहेत. याप्रकरणी शीतल यांचे पती अभिजीत वसंत गिरमे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार टेंपोचालक समाधान बाबू कंगले (वय 21, रा. परंदवडी, सोमाटणे फाटा) याला पोलिसांनी अटक केली. 

पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा लॉकडाउन?

पिंपरी-चिंचवडकरांनो सावधान! थुंकल्यास होणार हजार रुपयांचा दंड 

शनिवारी (ता. 12) रात्री साडेदहाच्या सुमारास शीतल व सायली या नवी सांगवीहून रावेतकडे दुचाकीने जात होत्या. त्यावेळी रावेत येथील बीआरटीएस रोडवर मस्के वस्तीकडे जाणाऱ्या वळणावर त्या आल्या असता, वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करीत भरधाव आलेल्या टेंपो (एमएच 14, एचयु 5940) शीतल व सायली यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने दोघींचा मृत्यू झाला. याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी टेंपोचालक कंगले याला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two sisters death in accident to tempro and two wheeler crash in ravet