रूग्णवाहिकेतून आलेल्या टोळक्‍याकडून दोघांना मारहाण; वाकडमधील घटना 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 September 2020

चिकन सप्लाय करण्याच्या कारणावरून रूग्णवाहिकेतून आलेल्या टोळक्‍याने दोघांना लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना वाकड येथे घडली. 

पिंपरी : चिकन सप्लाय करण्याच्या कारणावरून रूग्णवाहिकेतून आलेल्या टोळक्‍याने दोघांना लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना वाकड येथे घडली. 

विजय मोरे, संदीप मोरे, प्रदीप मोरे, संदीप देवकर (सर्व रा. हडपसर) यासह त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल झाला. मळू बाळू गेरंगे (वय 39, रा. लक्ष्मी अपार्टमेंट, शिवकॉलनी, वाकड) यांनी फिर्याद दिली. रविवारी (ता. 20) दुपारी तीनच्या सुमारास फिर्यादी हे वाकड येथे चिकन सप्लाय करीत असताना शिवकॉलनीजवळील आमीर चिकन सेंटर या दुकानासमोर तीन गाड्या आल्या. यामध्ये एका रूग्णावाहिकेचा समावेश होता. या गाड्यांमधून आमीर चिकन कंपनीचे मालक असलेले आरोपी व त्यांचे साथीदार उतरले. त्यांच्याकडे लोखंडी रॉड व लाकडी दांडके होते. 

चिखलीत घरावर दगडफेक; लाकडी दांडके, कोयत्याने तोडफोड 

बँकेतून बोलत असल्याचे सांगून निगडीत आठ लाखांची फसवणूक

फिर्यादीला अडवून शिवीगाळ करीत 'तू आमच्या कंपनीच्या दुकानांना माल का सप्लाय करतो, तुझ्याकडे बघून घेतो' असे म्हणत आरोपी विजय मोरे याने फिर्यादीच्या हातावर लोखंडी रॉड मारला. वाकडमधील आमीर चिकन सेंटरचे मालक परशुराम मल्हारी भिसे हे फिर्यादीला सोडविण्यासाठी आले असता प्रदीप मोरे, संदीप देवकर यांनी त्यांनाही लाकडी दांडक्‍याने मारहाण केली. त्यानंतर पुन्हा फिर्यादी व भिसे यांना आरोपींसह त्यांच्या साथीदारांनी बेदम मारहाण केली. तसेच 'रुग्णवाहिका यासाठीच आणली असून, त्याला खल्लास करून रूग्णवाहिकेतून दूर कुठेतरी टाकून देऊ' अशी धमकी आरोपींनी दिली. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two were beaten by a mob from an ambulance in Wakad