निगडीतील 107 मीटर उंचीच्या ध्वज स्तंभावर ध्वज फडकविणार की नाही, जाणून घ्या

मंगेश पांडे
Friday, 14 August 2020

शहराचे प्रवेशद्वार असलेल्या भक्ती-शक्ती समूह शिल्पासमोर 26 जानेवारी 2018 रोजी 107 मीटर उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्यात आला.

पिंपरी : निगडीतील भक्ती-शक्‍ती उद्यानात उभारण्यात आलेल्या 107 मीटर उंचीच्या ध्वज स्तंभावर स्वातंत्र्यदिनी ध्वज फडकविण्याबाबतचा निर्णय पाऊस व वारा याचा अंदाज घेऊन घेतला जाणार आहे. त्यामुळे येथील ध्वजवंदन कार्यक्रमाबाबत अनिश्‍चितता आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरात असा साजरा होणार स्वातंत्र्यदिन 

शहराचे प्रवेशद्वार असलेल्या भक्ती-शक्ती समूह शिल्पासमोर 26 जानेवारी 2018 रोजी 107 मीटर उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्यात आला. हा स्तंभाची उंची देशात दुसऱ्या क्रमांकाची असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, पाऊस व वादळी वाऱ्यामुळे ध्वज खराब होण्याची शक्‍यता असल्याने पावसाळ्याचे चार महिने वगळता उर्वरित आठ महिने या स्तंभावर ध्वज फडकत असतो. दरवर्षी स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताकदिनी याठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. माजी सैनिकांचा सन्मान, राष्ट्रभक्तिपर गीतांचा गजराने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण असते. शहरवासीय याठिकाणी एकत्रित येत एकमेकांना शुभेच्छा देतात. 

पिंपरीतील 'या' बँकेचं तीन दिवसांपासून सर्व्हर डाउन; नागरिकांना मनस्ताप 

मात्र, यंदा कोरोनामुळे सर्वच कार्यक्रमांवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे भक्ती-शक्ती उद्यानात होत असलेले कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत. तसेच शनिवारी (ता. 15) स्वातंत्र्यदिनी ध्वजवंदन करण्याबाबतचा निर्णयही पाऊस व चारा याचा अंदाज घेऊन घेतला जाणार आहे. पाऊस व वारा नसेल तरच स्तंभावर ध्वज चढविला जाणार आहे. 

भक्ती-शक्ती उद्यानातील ध्वजवंदन कार्यक्रमाची पूर्ण तयारी झालेली आहे. मात्र, पाऊस व वारा याचा अंदाज घेऊन ध्वजवंदन करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सांस्कृतिक कार्यक्रम यंदा होणार नाहीत.
- प्रवीण तुपे, अतिरिक्‍त आयुक्त, महापालिका 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uncertainty about flag waving program in Nigdi