वाहनचालांकानो, पुलाच्या कामासाठी सांगवीतील वाहतूकीत बदल! पर्यायी मार्गाचा करा वापर

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 17 October 2020

सांगवी वाहतूक विभागाच्या हद्दीतील ढोरे पाटील सबवे मधून औंध डी मार्टकडे जाणारा पूल रविवारपासून (ता.17) वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गाने जाणारे वाहनचालक राजीव गांधी पुलावरून औंध मार्गे इच्छितस्थळी जाऊ शकतात.

पिंपरी : सांगवी येथील ढोरे पाटील सबवे मधून औंध डी-मार्ट कडे जाणाऱ्या पुलाजवळ नवीन पुलाचे काम सुरू होणार आहे. या कामासाठी या परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सांगवी वाहतूक विभागाच्या हद्दीतील ढोरे पाटील सबवे मधून औंध डी मार्टकडे जाणारा पूल रविवारपासून (ता.17) वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गाने जाणारे वाहनचालक राजीव गांधी पुलावरून औंध मार्गे इच्छितस्थळी जाऊ शकतात. तसेच रक्षक चौकाकडून पिंपळे निलख-बाणेर मार्गेदेखील इच्छितस्थळी जाता येईल. तरी यामार्गाने जाताना वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करावे.

पिंपरी-चिंचवड : महापालिका विषय समित्यांच्या अध्यक्षपदासाठी रस्सीखेच!

''वाहतूक बदलाबाबत नागरिकांनी वाहतूक कर्मचारी व वॉर्डन यांना सहकार्य करावे, ''असे आवाहन पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाचे उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी केले आहे. 

सततच्या खंडीत वीजपुरवठ्यामुळे मोशीतील सोसायटीतील रहिवासी त्रस्त


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Use alternative routes due to change traffic route in Sangvi for bridge work