esakal | पिंपरी-चिंचवडकरांनो, भाज्यांचे भाव कडाडले; जाणून घ्या आजचे भाव 
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवडकरांनो, भाज्यांचे भाव कडाडले; जाणून घ्या आजचे भाव 
 • आवक कमी झाल्याचा परिणाम
 • पिंपरीत केवळ पाच भाज्यांची आवक 

पिंपरी-चिंचवडकरांनो, भाज्यांचे भाव कडाडले; जाणून घ्या आजचे भाव 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : गेल्या पंधरा दिवसांपासून शहरात फळभाज्या व पालेभाज्यांचे भाव कडाडले आहेत. गृहिणींचेही बजेट कोलमडले आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला भाजी खरेदी करणे परवडेनासे झाले आहे. परतीचा पावसाचा परिणामही भाज्यांच्या आवकवर झाला आहे. पिंपरीतील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत रविवारी (ता. 11) केवळ चार ते पाच भाज्यांची आवक दहा क्विंटल झाल्याचे पिंपरी घाऊक बाजाराचे आवक प्रमुख राजू शिंदे यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

लॉकडाउनपूर्वी 200 ते 250 शेतकऱ्यांचा माल भाजी मंडईत येत असे. सध्या 30 ते 40 शेतकरी भाजीपाला घेऊन पिंपरीत दाखल होत आहेत. त्यामुळे भाज्यांची टंचाई जाणवत आहे. लॉकडाउनमध्येही भाज्यांचे भाव गगनाला भिडले होते. किरकोळ भाजी विक्रेत्यांच्या मनमानी भावामुळे सर्वसामान्य नागरिक वैतागले होते. त्यानंतर काही दिलासा मिळेल, अशी आशा होती. मात्र, सर्वसामान्य वर्ग सध्या परिस्थितीत भाजी मंडईकडे फिरेनासा झाला आहे. 

पिंपरी-चिंचवड : सुटीच्या दिवशीच विजेचा खेळखंडोबा, नागरिक वैतागले  

पिंपरी : राजभवन सन्मानापासून वायसीएम रुग्णालयाच्या डॉक्टरांना ठेवले वंचित

कांद्याचेही भाव कडाडल्याने त्याचा वापर तुलनेने कमी झाला आहे. नोकऱ्यांवर आलेले गंडांतर व सर्वसामान्यांना हाताला काम नसल्याने बऱ्याच गृहिणींवर बेसन भाकरी गोड मानून खाण्याची वेळ आली आहे. पितृपंधरवड्यातही आठ दिवस भाज्यांचे भाव चढेच होते, त्यामुळे सर्वसामान्य नागरिक भाज्यांच्या भावाला त्रासला आहे. 

भाजीसाठी गिऱ्हाईक कमी आहे. पावसानेही चांगलीच हजेरी लावल्याने रविवार व गुरुवार सोडून भाजीला गर्दी नाही. 15 दिवसांपासून हीच परिस्थिती आहे. पावसामुळे चिखलाने माखलेल्या भाज्या येत आहेत. 
- संतोष बढे, भाजी विक्रेता, गणेश भाजी मंडई 

भाज्या....भाव (किलोमध्ये) 

 • कांदा : 50 
 • बटाटा : 40 
 • लसूण : 140 
 • टोमॅटो : 40 
 • फ्लॉवर : 100 
 • हिरवी मिरची : 80 
 • कोबी : 30 
 • गवार : 100 
 • शेवगा : 100 
 • पावटा : 80 
 • शिमला : 70 
 • राजमा : 100 
 • वाटाणा : 120 
 • वांगी : 80 
 • घेवडा : 80 
 • भेंडी : 60 
 • गिलके : 80 
 • काकडी : 20 

पालेभाज्या...जुडी प्रमाणे 

 • पालक : 15 
 • कोथिंबीर : 20 
 • मेथी : 20 
 • पालक : 15 
 • चवळी : 15 
 • शेपू : 15 
 • मुळा : 20 
 • आंबट चुका : 20 
 • अळू : 10