Chikhali-Water-Purification
Chikhali-Water-Purification

पिंपरी-चिंचवडच्या समाविष्ट गावांची पाणी समस्या अखेर निकालात

पिंपरी - शहरातील पाणी समस्या निकालात काढण्यासाठी अखेर यश मिळाले. शहराला सुमारे 100 दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणीपुरवठा दररोज नियमित होईल, असा नवा स्त्रोत निर्माण झाला आहे. 2021 च्या अखेरपर्यंत पाणीपुरवठा प्रकल्प कार्यान्वयीत करण्याची उद्दिष्ट आहे. 

आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून महापालिका प्रशासनाने चिखली येथील नियोजित जलशुद्धीकरण केंद्र ते देहू बंधारा अशुद्ध जलउपसा केंद्रापर्यंत जलवाहिनी टाकण्याच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले.

महापौर उषा ढोरे, आमदार लक्ष्मण जगताप, खासदार श्रीरंग बारणे, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, अण्णा बनसोडे, सग्राम थोपटे, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके आदी उपस्थित होते. 

पवना धरणातून पिंपरी-चिंचवडसाठी सर्वप्रथम 1984 मध्ये पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. त्यावेळी शहराची लोकसंख्या सुमारे आठ लाख होती. सद्यःस्थितीत शहराची लोकसंख्या सुमारे 25 लाखांच्या घरात आहे. त्यामुळे शहराला नवीन स्त्रोताची आवश्‍यकता होती. 

असा आहे प्रकल्प 
चिखलीत 300 एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येत आहे. जलवाहिन्या 1400 मिलिमीटर व्यासाच्या आहेत. 10 किलोमीटर लांब हे अंतर आहे. देहू येथे इंद्रायणी नदीवर बांध उभारून पाणी उचलण्यात येईल. ते पाणी चिखली जलशुद्धीकरण प्रकल्पात आणले जाईल. शुद्ध केलेले पाणी चऱ्होली, मोशी, डुडूळगाव, तळवडे, दिघी, चिखली आदी गावात पुरवठा केले जाईल. यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यावरील ताण कमी होणार आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या पवना धरणातून 500 एमएलडी पाणी नदीतून उपसा करते. त्यापैकी 30 टक्के म्हणजे सुमारे 150 एमएलडी पाणी वाया जाते. मात्र, या बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी थेट जलशुद्धीकरण प्रकल्पात आणणार आहे. त्यामुळे पाणी वाया जाणार नाही.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com