आम्ही सर्व नियम पाळू पण दुकाने उघडा; सलून व्यावसायिकांची मागणी

पहिल्या लॉकडाउनमध्ये सात महिने सलून बंद ठेवले. यात दुकानभाडे, लाइटबील अंगावर पडले. जमविलेल्या रकमेतून भाडे भरले.
Salon Business
Salon BusinessSakal

पिंपरी - पहिल्या लॉकडाउनमध्ये (Lockdown) सात महिने सलून बंद (Saloon Close) ठेवले. यात दुकानभाडे, लाइटबील अंगावर पडले. जमविलेल्या रकमेतून भाडे भरले. आता कसाबसा व्यवसाय सुरू होईल, असे वाटत असतानाच पुन्हा दुसरे लॉकडाउन पडले. यावेळीही दुकाने बंद ठेवल्याने अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. सलून व्यवसायाला (Business) लॉकडाऊनमधून शिथिलता देऊन दुकाने उघडण्यास परवानगी (Permission) द्यावी, आम्ही सर्व नियम (Rules) पाळून व्यवसाय करू, अशी मागणी सलून व्यवसायिकांसह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून होत आहे. (We follow all the rules but the shops are open Demand from salon professionals)

सद्यःस्थिती

- लॉकडाउनचा सर्वाधिक फटका सलून व्यवसायाला

- दररोजच्या उत्पन्नावर अवलंबून असणारा हा व्यावसायिक लमडला

- दुकाने बंद असल्याने इतर व्यवसाय करण्याची वेळ

- कारागिरांचीही झाली परवड

- काही परराज्यातील कारागीर असल्याने त्यांना गावी जाणेही अशक्य

- काही दुकानचालकच कारागिरांना सांभाळताहेत

- सरकारची तीन हजारांची आर्थिक मदत अद्याप मिळाली नाही

- समाज बांधवांच्या उदरनिर्वाह चालविण्यासाठी नाभिक संघटनेचाही पुढाकार

- वर्गणी काढून धान्याचे किट या कुटुंबांना वाटप

- सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी दुकानदारांनी खुर्च्यांची संख्याही केली कमी

Salon Business
महावितरण कर्मचाऱ्यांनी काळ्याफिती लावून केले ‘काम बंद’ आंदोलन

घरीच दाढी अन टक्कल

दाढी-कटिंगसह फेशियल, हेअर डाय व इतर कामांमध्ये चांगले पैसे मिळतात. मात्र, मागील लॉकडाउनमध्ये सलून दुकाने बंद असल्याने अनेकांनी घरीच दाढी करण्यासह स्ट्रीमरचा वापर करणे पसंत केले. अनेकांना याची सवय लागली. दरम्यान, दुकाने सुरू झाल्यानंतरही केवळ कटिंगसाठीच ग्राहक दुकानात येऊ लागले. अनेकजण दाढी, हेअरडाय घरीच करू लागले आहेत. फेशियल वगैरे करणे तर सोडूनच दिले आहे. त्यामुळे असे ग्राहक पन्नास टक्क्यांनी घटले असून, यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.’’

‘कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो तो व्यवसाय पुन्हा बंद पडल्याने अक्षरशः अंगातील अवसान गळाले असून, उपासमारीची वेळ आली आहे. घरभाडे, दुकानभाडे, लाइटबील, किराणा यासाठी पैसे आणणार कुठून असा प्रश्न आहे. मित्राच्या किराणा दुकानात काम करून कसाबसे दोन वेळचे अन्न मिळविण्याची वेळ आली आहे.’’

- विनोद जाधव, सलून व्यावसायिक

Salon Business
ब्लाऊजनं गळा आवळून सासूचा खून, पिंपरीत मुलगा-सूनेला अटक

‘माझ्यासह दोन कारागिरांचे पोट भरण्यासाठी धडपड सुरू आहे. व्यवसाय सुरू झाला तरी त्याला उभारी मिळेल की नाही याची चिंता सतावत आहे. ऍप्रन, मास्क, सॅनिटायझर यांचा वापर करून पुरेपूर खबरदारी घेऊ. मात्र, सलून व्यवसायाला लोकडाउनमधून शिथिलता द्यावी.’’

- जितेंद्र चित्ते, सलून व्यावसायिक

‘सलून व्यावसायिकांचे हातावर पोट असल्याने कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. आर्थिक मदत अद्यापही मिळालेली नाही. महापालिकेकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र, प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. सरकारने सलून दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी. सर्व नियम पळून ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेऊ. व्यवसायिकांच्या कुटुंबीयांची महाराष्ट्र नाभिक महामंडळाने वर्गणी काढून चारशे जणांना धान्याचे किट दिले आहेत. यापुढेही देत राहणार आहे.

- गणेश वाळुंजकर, शहराध्यक्ष, महाराष्ट्र नाभिक महामंडळ. पिंपरी-चिंचवड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com