Jairam Ramesh : केटीआर यांचा दावा खोटा ; जयराम रमेश

तेलंगणचे दरडोई उत्पन्न हे देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक
Jairam Ramesh
Jairam Rameshesakal
Updated on

नवी दिल्ली : तेलंगणाचे दरडोई उत्पन्न हे देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचा के. टी. रामाराव (‘केटीआर’) यांनी केलेला दावा काँग्रेसने सोमवारी खोडून काढला. तेलंगणचे मुख्यमंत्री आणि बीआरअसचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांचे पुत्र ‘केटीआर’ यांनी तेलंगणाच्या दरडोई उत्पन्नाबाबत केलेल्या दाव्यावरून काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी टीका केली आहे.

Jairam Ramesh
Share Market Tips: बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स असतील ऍक्शनमध्ये ?

तेलंगणचे दरडोई उत्पन्न हे देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे, असा दावा ‘केटीआर’ यांनी नुकताच केला होता. त्यावरून जयराम रमेश यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून टीका केली आहे. ‘‘तेलंगणाचे दरडोई उत्पन्न केवळ हैदराबाद, रंगारेड्डी आणि संगारेड्डी या जिल्ह्यांमुळे आहे.

राज्यातील उर्वरित ३० जिल्ह्यांतील नागरिक हे दारिद्र्यातच जगत आहेत. याउलट हरियाना आणि कर्नाटकचे दरडोई उत्पन्न हे तेलंगणापेक्षा अधिक आहे, तर तमिळनाडूचे उत्पन्न हे तेलंगणाच्या उत्पन्नाएवढेच आहे,’’ असा दावा त्यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com