Nitin Gadkari : वडगाव- वारजे दरम्यान दोन्ही बाजूला सेवारस्ता होणार : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली मंजुरी

nitin gadkari
nitin gadkarisakal

Nitin Gadkari : पश्चिम बाह्यवळण महामार्गाच्या वडगाव- वारजे दरम्यान सिंहगड रोड ते वारजे दरम्यान महामार्गालगत दीड किलोमीटर सेवा(सर्व्हिस) रस्ता नव्हता. सेवा रस्त्याच्या ३६ कोटी रुपयांच्या कामास आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर कार्यक्रमात मंजुरी दिली.

खडकवासला मतदार संघातील चांदणी चौक येथील कार्यक्रमात आमदार भीमराव तापकीर यांनी विविध मागण्या केल्या होत्या. त्यातील या मागणीस तात्काळ मान्यता दिली.

nitin gadkari
Peru Alien News : सात फुटांच्या एलियनने गावकऱ्यांवर केला हल्ला, बंदूकीच्या गोळ्यांनाही देत नाही दाद; प्रत्यक्षदर्शींचा दावा!

महामार्गावर जांभूळवाडी दरीपूल बोगद्यामार्गे मुंबई- बंगळूर मार्गावर वाहतूक कोंडी व अपघात नियंत्रण करण्यासाठी उपाय योजना करावी. यासाठी स्वामी नारायण मंदिर ते नऱ्हे जंक्शनपर्यंत उड्डाणपूल बांधण्यासाठीचा प्रस्ताव पाठविला आहे. त्याला मंजुरी देऊन आवश्यक निधी द्यावा.

-वडगाव बुद्रुक व नऱ्हे भागात दोन्ही बाजूस महानगरपालिकेने १२ मीटर रुदीचे अतिरिक्त डीपी रोड बनविणे आवश्यक आहे. त्यासाठी पुणे महानगरपालिका प्रशासनाला आदेश द्यावेत.

-महामार्गावरील उतार कमी होण्यासाठी नऱ्हे जंक्शन जवळ भुयारी मार्ग करावा.

nitin gadkari
Mumbai News : कोविड बॉडी बॅग घोटाळा; माजी महापौर किशोरी पेडणेकरांना आर्थिक गुन्हे शाखेचे समन्स

-भूमकर चौक नऱ्हे येथील सध्याचा भुयारी मार्ग अरुंद आहे. त्याच्या शेजारी आणखी एक रुंद भुयारी मार्ग करावा. -वडगाव नवले पूल ते कात्रज दरम्यान आंबेगाव शिवसृष्टी जवळील सध्याचा भुयारी मार्ग अरुंद आहे. त्याच्या शेजारी आणखी एक रुंद भुयारी मार्ग करावा.

nitin gadkari
Mumbai News : लहान मुलांमध्ये मूत्रपिंडाची वाढती गरज

वडगाव- वारजे दरम्यान सेवा रस्ता करण्यासाठी त्याचा डीपीआर करण्याची मागणी या पूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. त्या नुसार डीपीआर करण्यात आला. त्या कामाला त्यांनी मंजुरी द्यावी. अशी मागणी केली. त्यास त्यांनी तात्काळ मजुरी दिली.असे तापकीर यांनी सांगितले.

nitin gadkari
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'मी सांगतो, दयाबेन पुन्हा येणारच'! निर्मात्यांचा खुलासा

गडकरी यांनी भाषणात तापकीर यांची अन्य कामे देखील विचाराधीन आहे. असे सांगितले. पण कार्यक्रम झाल्यावर त्यांनी तुमच्या मतदार संघातील इतर सगळ्या कामांना तातडीने मजुरी देतो. असे सांगितल्याचे आमदार तापकीर यांनी ‘सकाळ’शी बोलताना माहिती दिली.

nitin gadkari
Sakal Podcast : लष्कर मणिपूरमध्ये काही करू शकत नाही ते मुख्यमंत्रीपदावर दावा नाही, अजित पवारांचा खुलासा

वडगाव- वारजे दरम्यान दोन्ही बाजूला 12 मीटरचा सेवा रस्ता असणार आहे. वडगाव येथील हॉटेल विश्वास पासून सेवा रस्ता सिंहगड रस्त्याला मिळतो. तेथून रस्ता क्रॉस करून समोरच्या बाजूने हा सेवा रस्ता दोन्ही कालवा, सनसिटी जवळील ओढा, येथे पूल असेल सध्याच्या सनसिटीच्या सेवा रस्त्याला मिळेल. आणि पुढे आल्यावर मुठा नदीवर सध्याच्या पुलाच्या उंची एवढा पूल असणार आहे. सेवा रस्त्याची रचना महामार्गाच्या दोन्ही बाजूला असणार आहे. यासाठी सुमारे ३६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

-संजय कदम, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com