

vandana from ashtvinayak
esakal
दिवाळी म्हटलं की घराची सजावट, आकाशकंदील, पणत्या, फराळ आणि फटाक्यांची आतषबाजी डोळ्यांसमोर येते. या सगळ्यासोबतच दिवाळीचा उत्साह वाढवणारं एक खास गाणंही दरवर्षी आवर्जून ऐकलं जातं. ते म्हणजे ‘आली माझ्या घरी ही दिवाळी’. आजही हे गाणं टीव्हीवर किंवा सोशल मीडियावर ऐकायला मिळतं. विशेष म्हणजे, या गाण्याला तब्बल ४७ वर्षांनंतरही तितकीच लोकप्रियता मिळत आहे. १९७९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अष्टविनायक’ या मराठी चित्रपटातील हे गाणं आजही प्रेक्षकांच्या आवडीचं आहे. या गाण्यात दिसलेली अभिनेत्रीदेखील प्रेक्षकांच्या मनात उतरली. तिच्या निरागस डोळ्यांनी आणि गोड आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. मात्र त्यानंतर ही अभिनेत्री कुठे गायब झाली? सध्या ती पडद्यावर दिसतेय. तुम्ही ओळखलंत का तिला?