
Bollywood Entertainment News : बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान त्याच्या लव्हलाईफमुळे चर्चेत आहे. नुकताच त्याचा साठावा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी त्याने त्याची नवी गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटची ओळख जगाला करून दिली. गौरीशी रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वी आमिरचा दोनदा घटस्फोट झाला आहे. पहिल्या घटस्फोटाचा मानसिक परिणाम आमिरवर झाल्याचा खुलासा त्याने स्वतः एका मुलाखतीत केला.