Entertainment News: घरी कोट्यवधींची संपत्ती अन् लग्झरी कार.. तरीही रिक्षामध्ये फिरतोय स्टारकिड; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले...

Aamir Khan: स्टारकिडचे रिक्षातून प्रवास करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटो आणि व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Aamir Khan
Aamir Khanesakal

Aamir Khan: स्टारकिड्सला अनेकवेळा नेपोटिझम या विषयावरुन ट्रोल करत असतात. अशातच आता एका स्टारकिडचं नेटकरी कौतुक करत आहेत. हा स्टारकिड हा लग्झरी कार सोडून चक्क रिक्षानं प्रवास करताना स्पॉट झाला. या स्टारकिडचे रिक्षातून प्रवास करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटो आणि व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

नेटकऱ्यांनी केलं जुनैदचं कौतुक

आमिर खानचा (Aamir Khan) मुलगा जुनैद खाननं (Junaid Khan) नुकताच रिक्षातून प्रवास केला. जुनैदचे रिक्षामधील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटो आणि व्हिडीओला कमेंट करुन नेटकऱ्यांनी जुनैदचं कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्यानं जुनैदच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओला कमेंट केली,"डाउन टू अर्थ", तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'हंबल'

पाहा व्हिडीओ:

Aamir Khan
Junaid Khan: काय सांगता आमिरच्या लेकानं हॉलिवूड सिनेमा केलाय? नेटकरी असं का म्हणताय?

जुनैद बॉलिवूड मध्ये करणार डेब्यू

आमिर खानचा मुलगा जुनैद खान लवकरच बॉलिवूडमध्ये क्षेत्रात पदार्पण करणार आहे. त्याचा 'महाराजा' हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीपासूनच जुनैद चर्चेत आहे.

जुनैदचे साई पल्लवीसोबतचे फोटो व्हायरल

काही दिवसांपूर्वीच नेटफ्लिक्सने तीन चित्रपटांचा फर्स्ट लूक शेअर केला होता. यामध्ये 'विजय 69', 'मंडला मर्डर्स' आणि जुनैदच्या 'महाराजा' यांचा समावेश आहे. जुनैद जपानमध्ये साऊथ अभिनेत्री सई पल्लवीसोबत शूटिंग करताना दिसला होता.

Aamir Khan
Aamir Khan Son Junaid : आमिरचा मुलगा जुनैद साऊथच्या साई पल्लवी सोबत? मिस्टर परफेक्शनिस्टचा 'मास्टरस्ट्रोक'?

काही महिन्यांपूर्वी जुनैदची बहिण आयरा खानचा लग्नसोहळा पार पडला. या सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लवाली होती. आयरानं फिटनेस ट्रेनर  नुपूर शिखरेसोबत (Nupur Shikhare) लग्नगाठ बांधली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com