

Raj Babbar Son Aarya Slams Pratik Babbar
esakal
Entertainment News : बॉलिवूडमधील खऱ्या फॅमिली बाहेरून जितक्या आनंदी दिसतात तितक्यात प्रत्यक्षात असतातच असं नाही. बब्बर कुटूंबातील वाद काही दिवसांपूर्वीच चव्हाट्यावर आला आहे. स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतिकने त्याचे वडील राज बब्बर यांच्याबाबत उघड नाराजी व्यक्त केली होती. तर त्याने त्यांच्याशी नातं तोडल्याचंही सांगितलं होतं. याबाबत आता त्याचा मोठा सावत्र भाऊ आर्यने नाराजी व्यक्त केली.