Abhijeet bhattacharya: "लग्नात गाणं गायल्यानं औकात कमी होते", म्हणणाऱ्या अभिजीत भट्टाचार्यांना गायकानं व्हिडीओ शेअर करत दिलं सडेतोड उत्तर

एका गायकानं एक व्हिडीओ शेअर करुन अभिजीत यांच्या वक्तव्याला सडेतोड उत्तर दिलं आहे.
Abhijeet bhattacharya
Abhijeet bhattacharyaesakal

Abhijeet Bhattacharya: अनेक हिट गाणी गायलेले गायक अभिजीत भट्टाचार्य (Abhijeet Bhattacharya) हे सध्या त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. अभिजीत यांनी नुकतीच एका गाण्याच्या शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये अभिजीत म्हणाले, "लग्नात गाणं गायल्यानं औकात कमी होते" त्यांचे हे वक्तव्य ऐकल्यानंतर कार्यक्रमाचं परीक्षण करणारी नेहा कक्कड (Neha Kakkar) ही भडकली, तिनं अभिजीत यांच्या वक्तव्याला सडेतोड उत्तर दिलं. आता आणखी एका गायकानं एक व्हिडीओ शेअर करुन अभिजीत यांच्या वक्तव्याला सडेतोड उत्तर दिलं आहे.

अभिजीत भट्टाचार्य यांचे वक्तव्य

'सुपरस्टार सिंगर 3'  या शोमध्ये अभिजीत भट्टाचार्य यांनी हजेरी लावली. या शोमधील अभिजीत यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अभिजीत हे 'सुपरस्टार सिंगर 3'  या कार्यक्रमाच्या एका स्पर्धकाला म्हणतात, "लग्नात गाणं गायल्यानं औकात कमी होते"

अभिजीत यांचे हे वक्तव्य ऐकल्यानंतर नेहा म्हणते, "मला एवढेच सांगायचे आहे की, कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते." यावर अभिजीत म्हणतात, "एक कोटी रुपयांसाठी गाणे आणि एक कोटी रुपये नाकारणे यात खूप फरक आहे."

गायकानं शेअर केला व्हिडीओ

गायक मिलिंद गाबा यानं अभिजीत यांचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन त्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. या व्हिडीओमध्ये अभिजीत हे एका लग्नात परफॉर्म करताना दिसत आहे. या व्हिडीओल मिलिंदनं कॅप्शन दिलं, "वो क्या था …… जिनके घर शीशे के हो .. वो बेसमेंट में कपडे चेंज करते हैं ??? यही था ना?"

पाहा व्हिडीओ:

मिलिंदनं अभिजीत यांचा आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिजीत हे एका शाळेच्या कार्यक्रमात परफॉर्म करताना दिसत आहे. या व्हिडीओला त्यानं कॅप्शन दिलं, "कोई दादा, दादी, चाचा, चाची किसी की औकात बता नहीं सकते हैं"

Abhijeet bhattacharya
Jazzy B: गाण्यामध्ये महिलांसाठी अपमानकारक शब्द वापरल्यानं पंजाबी गायक वादाच्या भोवऱ्यात; महिला आयोगाकडून कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com