GANA DHAV RE SPECIAL SONG FOR GANPATI BAPPA
esakal
ABHIJEET SAWANT WORKS WITH DAUGHTERS AHANA AND SAMEERA FOR THE FIRST TIME: अभिजीत सावंत नेहमीच नवनवीन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत असतो. आपल्या सुमधूर आवाजाने तो प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करताना दिसतो. त्याच्या वैविध्यपूर्ण शैलीतील गाण्यांमुळे त्यानं संगीतविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केलीय. दरम्यान अशातच आता त्याचा गणरायाच्या आगमनानिमित्त खास गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'गणा धाव रे' असं या गाण्याचं नाव असून या गाण्यात अभिजीतने गायनासोबत अभिनयही केला असल्याचं पाहायला मिळत आहे.