
प्रसिद्ध मल्याळम अभिनेता दिलीप शंकर यांचा मृतदेह एका हॉटेलमध्ये आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. तिरुअनंतपुरममधील एका हॉटेलमध्ये दिलीप शंकर मृतावस्थेत आढळले. एका मालिकेच्या शूटिंगसाठी ते तिरुअनंतपुरमला गेले होते. त्यानंतर चार दिवसांपूर्वी हॉटेलमध्ये त्यांनी खोली भाड्यानं घेतलेली. तर गेल्या दोन दिवसांपासून ते नॉट रिचेबल होते.